राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी सत्यपाल मलिक यांची मेघालय राज्याचे राज्यपाल म्हणून नियुक्ती केली आहे.
या नियुक्तिपूर्वी सत्यपाल मलिक गोव्याचे राज्यपाल होते.
भारतीय राज्यपाल हे एक संवैधानिक पद आहे. राज्याचा संकटकालीन निधी हा राज्यपालाच्या हाती असतो. राज्याचा दैनंदिन कारभार सांभाळण्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यावर असतो. राज्यपालाची नियुक्ती राष्ट्रपती करतात. राष्ट्रपतींचा प्रतिनिधी म्हणून संबंधित घटकराज्याचे काम राज्यपाल पाहतो. भारतीय संविधानातले कलम 153 यानुसार, प्रत्येक राज्यासाठी एक राज्यपाल असतो. भारताचे राष्ट्रपती भारतीय संविधानाच्या कलम 155 अन्वये राज्यपालांची नियुक्ती करतात.
No comments:
Post a Comment