✅ 22 सप्टेंबर 2020 रोजी ‘अभ्यास’ नामक हाय-स्पीड एक्सपेंडेबल एरियल टार्गेट (HEAT) म्हणजेच एका ड्रोनची उड्डाण चाचणी यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली. संरक्षण संशोधन व विकास संस्थेच्यावतीने (DRDO) ओडिशा राज्यात ही चाचणी घेण्यात आली. यावेळी दोन निदर्शक वाहनांची यशस्वी चाचणी घेण्यात आली.
✅ विविध क्षेपणास्त्र यंत्रणेचे मूल्यांकन करण्यासाठी लक्ष्य म्हणून ‘अभ्यास’चा उपयोग केला जाऊ शकतो.
🔆‘अभ्यास’ची वैशिष्ट्ये...
✅ उड्डाणासाठी यात जुळे अंडरलंग बूस्टरचा वापर करण्यात आला आहे. लहान गॅस टर्बाइन इंजिनाच्या मदतीने ते उडते.
✅ वाहनात मार्गदर्शन आणि नियंत्रणासाठी फ्लाइट कंट्रोल कंम्प्यूटर (FCC) सोबतच MEMS आधारित इनर्शल नेव्हिगेशन सिस्टिम (INS) बसविण्यात आले आहे.
✅ वाहनाच्या उड्डाणाचे ‘प्रोग्रॅमिंग’ स्वतंत्रपणे केले जाऊ शकते. तसेच वाहनाची सर्व कार्यप्रणाली लॅपटॉपच्या मदतीने GSAवरून संचालित केली जाऊ शकते.‘अभ्यास’ची रचना आणि विकास DRDOच्या एरोनॉटिकल डेव्हलपमेंट ईस्टॅब्लिशमेंट (ADE) या केंद्राने केले.
No comments:
Post a Comment