Monday, 28 September 2020

पराप्तिकर विभागाने 'चेहराविरहित प्राप्तिकर अपील' प्रणालीचा शुभारंभ केला.


🔰25 सप्‍टेंबर 2020 रोजी प्राप्तिकर विभागाने आज 'चेहराविरहित प्राप्तिकर अपील' (Faceless Income tax Appeals) प्रणालीचा शुभारंभ केला.


🔴परणालीची ठळक वैशिष्ट्ये


🔰या प्रणालीच्या अंतर्गत, प्राप्तिकरासंबंधीच्या सर्व अपीलांना चेहराविरहित वातावरणात चेहराविरहित पद्धतीने अंतिम स्वरूप देण्यात येणार. मात्र, गंभीर अफरातफरी, मोठ्या प्रमाणातली करचुकवेगिरी, संवेदनशील आणि तपासाबाबतची प्रकरणे, आंतरराष्ट्रीय कर आणि काळापैसा कायदा- याविषयीच्या प्रकरणांचा त्याला अपवाद असणार आहे.


🔰चहराविरहित अपील प्रणालीच्या अंतर्गत, माहिती विश्लेषण आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांच्या उपयोगातून प्रकरणांचे वितरण केले जाणार असून, यासाठी कार्यक्षेत्राचा व्यापक विचार केला जाणार आहे.

डॉक्युमेंट आयडेंटिफिकेशन नंबर (DIN) अर्थात दस्तऐवज परिचय क्रमांकही दिला जाणार आहे.अपीलाच्या आदेशाचा मसुदा एका शहरात तयार होणार तर त्याचे पुनर्परीक्षण दुसऱ्या शहरात होणार. त्यामुळे वस्तुनिष्ठ, न्यायसंमत आणि उचित पद्धतीने आदेश तयार होणार.


🔰चहराविरहित अपील प्रणालीमुळे करदात्यांचा तर फायदा होणारच शिवाय, न्यायसंमत आणि उचित अपील आदेश निघाल्याने पुढच्या संभाव्य कायदेशीर कृतींचे प्रमाण कमी होणार. या नवीन प्रणालीमुळे प्राप्तिकर विभागाच्या कामकाजात अधिक कार्यक्षमता, पारदर्शकता आणि उत्तरदायिता येण्यास मदत होणार आहे.


🔴इतर बाबी..


🔰दि. 13 ऑगस्ट 2020 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 'पारदर्शक करप्रणाली - प्रामाणिकतेचा सन्मान' मंचाचा भाग म्हणून, 'चेहराविरहित मूल्यांकन आणि करदाते' सनदीचा शुभारंभ केला होता.


🔰गल्या काही वर्षात, प्राप्तिकर विभागाने करप्रक्रिया सुलभ होण्यासाठी व करदात्यांच्या सोयीसाठी प्रत्यक्ष करांबाबत अनेक सुधारणा केल्या आहेत. आता, चेहराविरहित अपीलाच्या अंतर्गत प्राप्तिकराच्या अपिलांविषयीची पूर्ण प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने पूर्ण होणार असून, येथून पुढे अपील करणारी व्यक्ती आणि प्राप्तिकर विभाग यांमध्ये कोणत्याही प्रकारे प्रत्यक्ष संपर्काची गरज पडणार नाही.


🔰या प्रक्रियेत अपीलाचे ई-वितरण, नोटिशी किंवा प्रश्नावली ई-पद्धतीने कळविणे, ई-पडताळणी / ई-चौकशी पासून ते ई-सुनावणी आणि शेवटी अपिलीय आदेश ई-पद्धतीने कळविणे या साऱ्या टप्प्यांचा समावेश आहे. करदाते अगर त्यांचे प्रतिनिधी यांचा प्राप्तिकर विभागाशी कोणताही प्रत्यक्ष संपर्क येणार नाही. करदात्यांना त्यांच्या घरी बसून माहिती भरता येणार असल्याने त्यांच्या वेळेची आणि अन्य स्त्रोतांची बचत होऊ शकणार आहे.


🔴भारतातला प्राप्तिकर...


🔰भारतातला प्राप्तिकर हा भारतीय संविधानाच्या सातव्या अनुसूचीच्या केंद्रीय यादीतल्या ‘नोंद 82’ याद्वारे शासित आहे आणि केंद्र सरकारला ‘प्राप्तिकर अधिनियम-1961’ आणि ‘प्राप्तिकर नियम-1962’ अन्वये अकृषक उत्पन्नावर कर आकारण्याचे अधिकार दिले गेले आहेत. प्राप्तिकर विभाग हा केंद्र सरकारचा प्रमुख महसूल संकलक आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...