Friday, 19 July 2024

लखनऊ ऐक्य व लखनऊ करार



🖍गोखलेंच्या भारत सेवक समाजास होमरुल लीगचे सदस्य होण्याची संमती नव्हती, परंतु त्यांनी देखील भाषण दौरे आयोजित करुन होमरुलला पाठबळ दिले.

🖍होमरूल कार्यपध्दती ही गांधीजींना मान्य नव्हती व होमरूलसाठीची ही योग्य वेळ नाही असे त्यांचे मत होते. 

🖍या अधिवेशनासाठी टिळकांच्या होमरूल लीगने ‘काँग्रेस स्पेशल’ व ‘होमरूल स्पेशल’ म्हणून लखनौसाठी या दोन स्पेशल आगगाडयांची व्यवस्था केली.

🖍या अधिवेशनात ॲनी बेझंट यांच्या प्रयत्नाने जहालांना पुन्हा काँग्रेसमध्ये औपचारिकरित्या सामील करून घेण्यात आले. यास ‘लखनौ ऐक्य’ असे म्हणतात.

🖍आता काँग्रेसची दारही जहाल गटाला खुली झाल्यानंतर ती पुन्हा प्रभावीत तसेच गतीशील बनली व राष्ट्रीय आंदोलनाचे नेतृत्व करण्याची ताकद तिच्यात पुन्हा निर्माण झाली.

🖍याअधिवेशनात एक मुखाने स्वराज्याची मागणी करण्यात आली.

🖍काँग्रेस व मुस्लिम लीग दोघांच्या राजकीय मागण्या सारख्याच असाव्यात म्हणून काँग्रेस व मुस्लिम लीग यांमध्ये एक करार करण्यात आला. त्यास लखनौ करार असे म्हणतात.

🖍या कराराव्दारे काँग्रेसने मुस्लिम लीगची स्वतंत्र मतदार संघाची मागणी मान्य केली, तर मुस्लिम लीगने काँग्रेसच्या साम्राज्यांतर्गत स्वराज्याच्या मागणीचे समर्थन केले.

🖍तसेच मुस्लिमांच्या अल्पसंख्य प्रांतातून मुस्लिम लोकसंख्येच्या प्रमाणापेक्षा जास्त प्रतिनिधी 
पाठविण्यासंबंधीची मागणी मुस्लिम लीगने काहीशी सौम्य केली.

🖍आता काँग्रेस व लीग यांच्यात राजकीय मागण्याबाबत मतैक्य होवून भारताच्या राजकीय क्षेत्रात समान उद्दिष्ट पूर्तीसाठी या संघटना सहकार्यास सिध्द झाल्या. (वस्तुत: काँग्रेसने व्यवहारीक दृष्टीकोनातून राष्ट्रीय सामंजस्यासाठी मुस्लिमांचे स्वतंत्र मतदार संघ आनंदाने स्विकारुन नाईलाजाने केलेली एक तात्विक तडजोड होती.)

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...