🛶(१) सागर म्हणजे काय ?*
--- जमिनीने पूर्णः किंवा अंशतः वेढलेल्या
खा-या पाण्याचा जलभाग म्हणजे सागर
किंवा समुद्र होय.
🛶(२) महासागर म्हणजे काय ?*
--- दोन खंडांदरम्यान पसरलेला खा-या
पाण्याचा विस्तीर्ण (मोठा) साठा म्हणजे
महासागर होय.
🛶(३) उपसागर म्हणजे काय ?*
--- सर्वसाधारणपणे जमिनीने तीन बाजूंनी
वेढला गेलेला सागराचा लहान भाग म्हणजे
उपसागर होय. उदा. बंगालचा उपसागर.
🛶(४) आखात म्हणजे काय ?*
--- जमिनीत घुसलेला सागराचा अरुंद भाग,
म्हणजे आखात होय.
🛶(५) सरोवर म्हणजे काय ?*
--- भूपृष्ठावरील सखल भागात नैसर्गिकरीत्या
तयार झालेला जलाशय म्हणजे सरोवर
होय.
🛶(६) जलावरण म्हणजे काय ?*
--- पृथ्वीवरील पाण्याने व्यापलेला भाग,
म्हणजे जलावरण होय.
🛶(७) खाडी म्हणजे काय ?*
--- समुद्राचे पाणी नदीच्या मुखातून जेथेपर्यंत
नदीत शिरते, त्या नदीच्या भागाला खाडी
म्हणतात.
🛶(८) सागरी मैदान म्हणजे काय ?*
--- सागरतळाचा सपाट व सखल भाग
म्हणजे सागरी मैदान होय.
🛶(९) गर्ता म्हणजे काय ?*
--- सागरातील अरुंद व अतिखोल भागास
गर्ता म्हणतात.
🛶(१०) सागरी डोह म्हणजे काय ?*
--- सागरतळावर काही ठिकाणी खोल,अरुंद
आणि तीव्र उतारांची सागरी भूरूपे
आढळतात. त्यातील कमी खोलीच्या
अरुंद व तीव्र उतारांची सागरी भूरूपे
म्हणजे सागरी डोह होय.
No comments:
Post a Comment