🖍7 जुलै :- लॉर्ड कर्झनच्या नेतृत्वात सिमल्याहुन बंगालच्या फाळणीची घोषणा करण्यात आली.
🖍19 जुलै :- सरकारने अधिकृतरित्या बंगालच्या फाळणीचा निर्णय घेतला.
🖍कर्झनने विल्यम वाॅर्ड याच्या योजनेनुसार बंगालच्या फाळणीचा निर्णय घेतला होता.तसेच सदरील फाळणीची योजना ही विल्यम वाॅर्डच्या कल्पनेनुसार बंगालचा ले. गव्हर्नर सर ॲड्रयुव
फेझर याने आखली होती.
🖍20 जुलै :- बंगालचे विभाजन 2 भागांत करण्यात आले.
🖍16 ऑक्टोबर :- फाळणी अंमलात आली.
🖍फाळणीचे कारण :- ‘प्रशासकीय सीमांचे पुनर्निर्धारण’ असे सांगण्यात आले.
🖍16 ऑक्टोबर हा दिवस बंगालमध्ये ‘राष्ट्रीय शोक दिवस’ म्हणून मानला गेला.
🖍परारंभी या फाळणीला तेथील मुसलमानांनी विरोधच केला होता, परंतु योजना घोषीत झाल्यानंतर कर्झनने पुर्व बंगालचा दौरा केला असता त्या दौऱ्यात त्याने म्हटले होते की, फाळणीचा उद्देश मुस्लिम प्रांत बनविणे हा आहे जेथे इस्लाम हा मुख्य धर्म असेल आणि त्याच्या अनुयायांचे वर्चस्व असेल.
(यामागील कर्झनच्या हेतू म्हणजे मुसलमान बहुसंख्येचा मुस्लिम प्रांत तयार करुन त्यांना ब्रिटिश
सत्तेविरुध्द लढा देणाऱ्या राष्ट्रीय चळवळीपासून दूर ठेवणे हा होता.)
यामुळे पूर्व बंगालमध्ये मुसलमान स्वाभाविकच खुश झाले.
🖍या फाळणीच्या विरोधात संपूर्ण देशभरात वंग भंग व स्वदेशी चळवळ सुरू करण्यात आल्या.
🖍सरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी वंग भंग चळवळीचे नेतृत्व पत्करले.
🖍फाळणी अंमलात येण्याच्या आधीच 7 ऑगस्ट रोजी या चळवळीला सुरूवात झाली.
🖍दादाभाई तसेच गो. कृ. गोखलेंनी देखील या आंदोलनास आपला पाठींबा दर्शविला होता.
🖍ही चळवळ बंगालमधील संपूर्ण राष्ट्रीय नेतृत्वाची चळवळ होती.
🖍या चळवळीचे प्रथम नेतृत्व सुरेंद्रनाथ
बॅनर्जी व कृष्णकुमार मित्रा या मवाळ नेत्यांनी केले तर नंतरच्या टप्प्यात चळवळीचे नेतृत्व जहाल व
क्रांतिकारकांच्या हातात गेले.
🖍जहालवाद्यांनी वंग भंग चळवळीचे रूपांतर जणचळवळीत करण्याचा प्रयत्न केला.
🖍वगभंग/स्वदेशी चळवळीत जहाल व मवाळांनी परस्परांच्या सहाकार्याने कार्य केले होते.
🖍टिळकांचा चतु:सुत्री कार्यक्रम :- बहिष्कार, स्वदेशी, स्वराज्य, राष्ट्रीय शिक्षण.
🖍यावेळी वि.दा. सावरकर यांनी पुण्यात पहिली परदेशी कपड्यांची होळी केली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा