विश्वेश्वरैयांचे कार्य -
१८८३ साली सिंध प्रांतातील सक्कर या शहराला सिंधू नदीपासून पाणी पुरवण्यासाठी व शुद्धिकरणासाठी त्यांनी प्रसिद्ध ‘सक्कर’ बंधाऱ्याची योजना केली व या योजनेच्या यशामुळे त्यांना “केसर ए हिंद” नावाने गौरविण्यात आले.
बैंगलोर, पूणे,म्हैसूर, बड़ौदा, कराची, हैदराबाद, ग्वालियर, इंदौर, कोल्हापुर, सूरत, नाशिक, नागपुर, बीजापुर, धारवाड़ सहित अनेक भागांत जलसिंचन व्यवस्था करुन जलसमृद्ध करण्याचे कार्य त्यांनी केले.
१८९९ मध्ये शेतकऱ्यांसाठी ब्लॉक सिस्टिम शोधून काढली ही कृषी सिंचन क्षेत्रातील क्रांतीच म्हणावी लागेल.
तसेच धरणातील वाया जाणारे पाणी थांबवण्यासाठी स्वयंचलित दरवाजाची रचना केली.
त्यांनी शिवसमुद्रम, शिंशा, गिरसप्पा, कृष्णराजसागरसाठी अनेक धरणांच्या योजना आखून कार्यवाही केली, त्यामुळे घराघरांतून वीज खेळविली गेली व अनेक कारखाने सुरू झाले.
डॉ.विश्वेश्वरय्या यांनी कावेरी नदीवर कृष्णराजसागर धरणाची योजना आखली व त्याच्या नजीकच वृंदावन बगच्याची रचना केली हा बगिचा आजही पर्यटकांचे आकर्षण बनले आहे.
विश्वेश्वरैया यांनी हैदराबाद शहराचे पूरापासुन संरक्षण करण्यासाठी जी प्रणाली विकसित केली.
विशाखापट्टणम बंदरास समुद्री पाण्यापासुन गंजरोधक करण्याची प्रणाली तयार करण्यातही त्यांनी पुढाकार घेतला.
याचबरोबर मा.महादेव गोविंद रानडे, गोपाळ गणेश आगरकर व लोकमान्य टिळकांबरोबर देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातही त्यांनी कार्य केले.
व्यापार आणि उद्योगधंदे यांच्या वाढीसाठी त्यांनी ‘बँक ऑफ म्हैसूर’ च्या स्थापनेमध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता..
डॉ.विश्वेश्वरय्या यांनी लोकांचे अज्ञान व दारिद्र्य नष्ट ह्वावे यासाठी लढा उभारला आणि यातूनच म्हैसूर विद्यापीठाची निर्मिती झाली.
म्हैसूर सोप फॅक्टरी,किटकनाशक प्रयोगशाळा,भद्रावती आयर्न व स्टील वर्कस्,श्री जयचमाराजेन्द्र पॉलीटेक्निक इंस्टीट्युट,बंगलोर ऍग्रीकल्चरल युनिव्हर्सिटी,स्टेट बँक ऑफ मैसुर,सेंचुरी क्लब,मीसुर चेंबर ऑफ कॉमर्स असे अगणीत औद्योगीक प्रकल्प सुरु केले.
त्यांच्या या कार्याने प्रेरित होऊनच टाटांनी त्यांची टाटा इस्पातच्या सल्लागारपदी नेमणूक केली होती. या पदावर त्यांनी १९२७ ते १९५५ पर्यंत काम केले.
देशात अर्थव्यवस्था नियोजन असावे, यावर काम करणारे डॉ.विश्वेश्वरय्या पहिलेच अभियंता होते. त्यांनी या विषयावर ‘प्लॅन्ड इकोनॉमी फॉर इंडिया’ हे पुस्तक लिहिले आहे.
No comments:
Post a Comment