Monday, 14 September 2020

खारफुटी जंगले



♻️आंतरराष्ट्रीय खारफुटी वने दिन - २६ जुलै♻️

🟩 खारफुटी ही चिखलात, घट्ट माती नसलेल्या जागी आणि भरतीचे पाणी घुसणाऱ्या भागात वाढते.

🔸मराठीत या वनस्पतीला कच्छ वनस्पती,
🔸इग्रजीत मॅंग्रोव्ह असे म्हणतात.
🔸 तिवर हा या समूहातील एक उपप्रकार आहे.

🔷या वनस्पतीमुळे बनलेल्या वनश्रीला कांदळवन म्हणतात.

🔺भारतामध्ये जगातील सर्वांत जास्त खारफुटीचे जंगल हे भारताच्यापूर्व किनारपट्टीवर असणारे सुंदरबनचे जंगल आहे.


🔶जगामध्ये खारफुटी वनस्पतीच्या एकूण ७३ जाती आहेत.
🔹तयापैकी भारतामध्ये ४६ जाती आहेत.
🔹पश्चिम किनार पट्टीवर २७,
🔹पर्व किनार पट्टीवर ४०,
🔹अदमान आणि निकोबार या बेटावर ३८ जाती आहेत.

♻️उपयुक्तता♻️

🔘खारफुटीचे लाकूड चमकदार असले, तरी आर्थिक दृष्ट्या ते फारसे उपयुक्त नसते.

🔘मोठ्या झाडांचे लाकूड बंदरातील गोदी व धक्के बांधण्यासाठी वापरले जाते.

🔸कारण या वनस्पतीचे लाकूड पाण्यात कुजत नाही, तसेच त्याला कीड लागत नाही.

🔘तांबड्या खारफुटीच्या सालीपासून टॅनिन हा पदार्थ मिळतो.
🔸टनिनचा उपयोग कातडी कमाविण्यासाठी, रंगविण्यासाठी व माशांची जाळी मजबूत बनविण्यासाठी केला जातो.

🔘निपा नावाचे पाम जातीचे झाड असते, त्यापासून साखर निर्माण करतात.

🔘चिपी जातीच्या झाडांच्या फळांपासून श्रीलंकेत खाद्यपेये बनवतात.

🔘खारफुटीच्या विविध जातींपासून पारंपरिक औषधे तयार होतात.

🔘मेस्वाल या वनस्पतीपासून साबणापासून टूथपेस्टपर्यंत विविध वस्तू तयार होतात.

 🔘Acanthus ilicifolius ही वनस्पींपासून अस्थमा, संधीवात आणि त्वचा विकार हा बरा होतो.

 🔘तिवर या वनस्पतीचा जनावरांच्या चाऱ्यासाठी उपयोग केला जातो.

🔴या समूहात एकच विषारी वनस्पती आढळते ती म्हणजे इक्झोकरीआ अगर गेवा.🔴

✅ गीर फाऊंडेशन ही संस्था गुजरात मधील खारफुटी वनस्पतीवर काम करीत आहे. ✅

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...