Monday, 14 September 2020

बराह्मणेतरांच्या संघटना

 - डेक्कन रयत समाज, मराठा राष्ट्रीय संघ, ऑल इंडिया मराठा लीग.

🌼 डक्कन रयत समाज

१) ऑगस्ट 1916 मध्ये महाराष्ट्रात डेक्कन रयत समाज नावाची संघटना अस्तित्वात आली.

२) अण्णासाहेब लठ्ठे, मुकुंदराव पाटील, नाशिकचे रामचंद्र बंडेकर, वालचंद कोठारी, सीताराम बोले, कविवर्य नारायण टिळक यांनी ही संघटना स्थापन केली.

३) ही ब्राह्मण इतरांची पहिली राजकीय संघटना होय.

४) या संघटनेच्या वतीने डेक्कन रयत या नावाचे साप्ताहिक अण्णासाहेब लठ्ठे यांनी सुरू केले होते.

५) उच्चवर्णीयांच्या सामाजिक जुलुमाखाली दडपलेल्या मागास जातींना न्याय मिळवून देणे हा या संस्थेचा हेतू होता.

🌼 मराठा राष्ट्रीय संघ

१) 26 ऑक्टोबर 1917 रोजी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी पुणे येथे हे मराठा राष्ट्रीय संघ स्थापन केला होता.

२) हा संघ स्थापन करण्यात काशिनाथ ठकुजी जाधव, त्रंबक हरी ओटे, नारायण एरवंडे, सखारामपंत जेधे आदींचा सहभाग होता

३) राष्ट्रीय सभेला अनुकूल असे धोरण आखण्याचे या सभेने ठरवले होते.

🌼 ऑल इंडिया मराठा लीग

१) 19 डिसेंबर 1917 रोजी पुणे येथे  ऑल इंडिया मराठा लीग ही संस्था बाबुराव जेधे यांनी स्थापन केली होती.

२) जॉईंट सिलेक्ट कमिटी पुढे या संस्थेच्या वतीने साक्ष देण्यासाठी एक शिष्टमंडळ पाठविले होते.

३) भास्करराव जाधव इंग्लंडला गेले इंग्लंडला गेले पण विलायतेतील लोकांना आपल्या जातीचे गोड बंगाल पटवून देणे कठीण आहे आहे हे त्यांच्या लक्षात आले.

वरील तीनही संघटनांनी ब्राह्मणेतर समाजात राजकीय व सामाजिक जागृती घडवून आणली म्हणून ब्राह्मणेतर चळवळ सुरू झाली.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...