Wednesday, 23 September 2020

इस्लामिक देशांवरही मोदींची जादू; सहा देशांनी प्रदान केलाय सर्वोच्च नागरी सन्मान:



📚पतप्रधान नरेंद्र मोदी यांना २०१९ साली ऑगस्ट महिन्यामध्ये दोन दिवसात दोन देशांनी सर्वोच्च नागरी सन्मान देऊन गौरवले. संयुक्त अरब अमिरातीमध्ये २४ ऑगस्ट रोजी ‘ऑर्डर ऑफ झायेद’ या पुरस्काराने मोदींना सन्मानित केले. ‘ऑर्डर ऑफ झायेद’ हा यूएईमधला सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. तर २५ ऑगस्ट रोजी बहारिनने ‘किंग हमाद ऑर्डर ऑफ दि रिनैसन्स’ हा पुरस्कार देऊन मोदींचा गौरव केला. मात्र मोदींचा अशाप्रकारे एखाद्या मुस्लीम बहुल इस्लामिक राष्ट्रांकडून सन्मान होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. 


📚मोदी पंतप्रधानपदी विराजमान झाल्यापासून सहा इस्लामिक देशांनी त्यांना सर्वोच्च नागरी सन्मान देऊन गौरविले आहे. याच सहा खास सन्मानांबद्दल जाणून घेऊयात..


■**संयुक्त अरब** : अमिराती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना २४ ऑगस्ट २०१९ रोजी संयुक्त अरब अमिरातीमधील सर्वोच्च अशा ‘ऑर्डर ऑफ झायेद’ या नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंध बळकट करण्यासाठी मोदींनी जे प्रयत्न केले त्यासाठी त्यांना या पुरस्काराने गौरवण्यात आले. यूएईचे संस्थापक शेख झायेद बिन सुल्तान अल नाहयान यांच्या नावाने ‘ऑर्डर ऑफ झायेद’ हा पुरस्कार दिला जातो. या पुरस्काराचे आणखी एक वैशिष्टय म्हणजे शेख झायेद यांच्या जन्म शताब्दी वर्षात मोदींना हा पुरस्कार देण्यात आला.


■बाहरिन : भारत आणि बहारिन यांच्यातील द्विपक्षीय संबंध बळकट करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना २५ ऑगस्ट २०१९ रोजी बहारिनचे राजे हमाद बिन इसा बिन सलमान अल खलिफा यांच्या हस्ते ‘किंग हमाद ऑर्डर ऑफ दि रिनैसन्स’ हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.


■पॅलेस्टाईन : 'द ग्रॅण्ड कॉलर ऑफ द स्टेट ऑफ पॅलेस्टाईन' हा पुरस्कार मोदींना १० फेब्रुवारी २०१८ रोजी प्रदान करण्यात आला. परदेशी नागरिकांना पॅलेस्टाईनकडून देण्यात येणारा हा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे.


■सौदी अरेबिया : 'द किंग अब्दुल्लाझीज' हा पुरस्कार सौदी अरेबियातील सर्वोच्च नागरी सन्मान आहे. मोदींना ३ एप्रिल २०१६ साली एप्रिल महिन्यात हा पुरस्कार सौदी अरेबियाने प्रदान केला.

अफगाणिस्तान : 'द आमीर अमनुल्हा' हा पुरस्कार अफगाणिस्तानमधील सर्वोच्च पुरस्कार पंतप्रधान मोदींना ३ जून २०१६ रोजी प्रदान केला. अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी यांच्या हस्ते हा पुरस्कार मोदींनी प्रदान करण्यात आला होता.


■मालदीव : ८ जून २०१९ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींना मालदीवचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘रुल ऑफ निशान इझ्झुदीन’ देऊन गौरवण्यात आले. मालदीवचे राष्ट्रपती इब्राहिम मोहम्मद सोलिह यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...