●▬▬▬▬⚜️۩۞۩⚜️▬▬▬▬●
🎯विषय :- परीक्षेच्या वेळी शारीरिक/परस्पर अंतराच्या (Social Distancing) अनुषंगाने करावयाची कार्यवाही/उपाययोजना
●▬▬▬▬⚜️۩۞۩⚜️▬▬▬▬●
▪️कोव्हिड-१९ विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांच्या आरोग्याच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महाराष्ट्र
लोकसेवा आयोगामार्फत आयोजित परीक्षांकरीता आयोगाकडून विहित करण्यात आलेल्या मानक कार्यप्रणाली (Standard Operating Procedure-SOP) नुसार उमेदवारांना खालीलप्रमाणे सुचित करण्यात येत आहे :-
●▬▬▬▬⚜️۩۞۩⚜️▬▬▬▬●
(१) परीक्षा उपकेंद्रामध्ये प्रवेश करतांना उमेदवाराने किमान तीन पदरी कापडाचा मुखपट (Mask) परिधान करणे
अनिवार्य आहे.
(२) परीक्षा कक्षामध्ये मुखपट, हातमोजे व सॅनिटाईझरची लहान पिशवी (Pouch) असलेलने प्रत्येकी एक किट
उमेदवारांना उपलब्ध करुन देण्यात येईल. त्याचा वापर उमेदवारांनी दोन्ही सत्राकरीता (असल्यास) करणे अनिवार्य
आहे.
(३) परीक्षेच्या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान उमेदवारांनी स्वच्छता (Cle anliness) तसेच आरोग्यास हितावह (Hygienic)
वातावरण राखण्यासाठी हात सतत सॅनिटाईझ सिम्पलीसिटी करणे आवश्यक आहे.
(४) कोव्हिड-१९ सदृश्य लक्षणे जसे की ताप, सर्दी, खोकला इत्यादी दिसून येत असल्यास संबधित परीक्षा उपकेंद्रावरील
पर्यवेक्षकीय अधिकारी/कर्मचारी यांना आगाऊ कळवावे.
(५) उमेदवारांनी -आरोग्य सेतु" अॅप डाऊनलोड करणे त्यांच्या हिताचे आहे.
(६) उमेदवाराने स्वत:चा जेवणाचा डबा/अल्पोपहार व पाण्याची बाटली सोबत आणावी.
(७) दोन पेपरच्या मधल्या वेळामध्ये उमेदवारांना परीक्षा उपकेंद्राच्या बाहेर जाण्यास मनाई आहे.
(८) परीक्षा कक्षात एकमेकांचे पेन, लिखाण साहित्य इत्यादी वापरण्यास उमेदवारांना सक्त मनाई आहे.
(९) शारीरिक/परस्पर अंतर राखण्याच्या अनुषंगाने परीक्षा उपकेंद्रावरील उचित माहिती फलक. सांकेतिक सिम्प्लिफाईड चिन्हे.भित्तिपत्रिका इत्यादी वरील सूचनांचे सर्व उमेदवारांनी कटाक्षाने पालन करावे.
(१०) प्रतिबंधित क्षेत्रामधील परीक्षा उपकेंद्रावरील उमेदवारांची बैठक व्यवस्था ऐनवेळी इतर परीक्षा उपकेंद्रावर करण्यात
आल्यास यासंदर्भात आयोगाच्या संकेतस्थळावर सूचना प्रसिध्द करण्यात येईल. तसेच संबधित उमेदवाराला
त्याच्या आयोगाकडील नोंदणी क्रमांकावर एसएमएस (Msg) द्वारे कळविण्याची व्यवस्था करण्यात येईल.
(११) परोक्षा संपल्यानंतर परीक्षा उपकेंद्राबाहेर जाताना शारिरीक /परस्पर अंतर राखणे उमेदवारांना अनिवार्य आहे.
(१२) वापरलेले टिश्यु पेपर, मुखपट, हातमोजे, सॅनिटाईझ पाऊच, इत्यादी वस्तू परीक्षा उपकेंद्रावरील आच्छादित
कुंडीमध्ये (कचराकुंडी) टाकावेत.
(१३) कोव्हिड-१९ विषाणूच्या प्रादुर्भावाच्या अनुषंगाने केंद्र व राज्य शासन तसेच स्थानिक प्राधिकरणाकडून वेळोवळी जारी करण्यात आलेल्या सर्व सूचना/आदेश यांचे काटेकोरपणे पालन करावे.
▪️शारीरिक/परस्पर अंतराच्या अनुषंगाने वरीलप्रमाणे व प्रवेश प्रमाणपत्रावर दिलेल्या सूचनांचे उमेदवारांनी काटेकोरपणे पालन करावे.
No comments:
Post a Comment