Friday, 18 September 2020

मराठी - वाक्यप्रचार व अर्थ


1)हातातोंडाची गाठ पडणे - कसेबसे खाण्यास मिळणे


2) गयावया करणे - केविलवाणी विनंती करणे


3)अंगाचा तिळपापड होणे - अतिशय संतापणे


4)पगडा बसवणे - छाप, प्रभाव पाडणे

मूग गिळणे - अपमान सहन करुन गप्प राहणे


5)वाटाण्याच्या अक्षता लावणे - नाकारणे


6)कस्पटासमान लेखणे - क्षुल्लक, कमी दर्जाचे समजणे


7)नामानिराळा राहणे - अलिप्त राहणे


8)द्त्त म्हणून उभा राहणे - अचानक येणे


9)जन्माची माती होणे - जीवन व्यर्थ होणे


10)चारी मुंड्या चीत होणे - संपूर्ण पराभव होणे


11)सर्द होणे - वरमणे, थिजून जाणे


12)रामराम ठोकणे - निरोप घेणे


13)आकाशपाताळ एक करणे - फार आरडाओरडा करणे


14)कानामागून येऊन तिखट होणे - मागाहून येऊन वरचढ होणे



15) उमाळा येणे - तीव्र इछा होणे


16) वर्ज्य करणे - टाकणे


17) काडीमोड करणे - संबंध तोडणे


18) अहमहमिका चालणे - चढाओढ लागणे


19) अगतिक होणे - उपाय न चालणे


20) कां-कूं करणे - एखादी गोष्ट करण्यास तयार नसणे


21) आभाळ फाटणे - मोठे संकट येणे


22) इडापिडा टळणे - संकट जाणे


23) उतराई होणे - उपकार फेडणे


24) अंतर्मुख होणे - स्वत:शी विचार करणे


25) लकडा लावणे - सारखी घाई करणे


26) परिपाठ ठेवणे - सवय ठेवणे


27) ब्रह्मांड कोसळणे - मोठे संकट येणे


28)कागाळी करणे - तक्रार करणे


29) खांदा देणे - मदत करणे


30) खोबरे करणे - नाश करणे


31) गय करणे - क्षमा करणे


32) न्यूनगंड वाटणे - कमीपणा वाटणे


33) जीव मुठीत घेणे - फार घाबरणे


34) जीव ओतणे - मन लावून काम करणे


35) सुपारी देणे - आमंत्रण देणे


36) तोंडाला तोंड देणे - उद्धटपणे बोलणे


37) डोळे दिपणे - आश्चर्य वाटणे


38) नामोहरम होणे - पराभूत होणे


39) पदर पसरणे - याचना करणे


40) पाणउतारा करणे - अपमान करणे


41) वाली नसणे - रक्षणकर्ता नसणे


42) हात तोकडे पडणे - मदत करण्यास  क्षमता कमी पडणे


43) हिरमुसले होणे - नाराज होणे


44) पांग फेडणे - इच्छा पूर्ण करणे


45) विटून जाणे - त्रासणे


46) डोके सुन्न होणे - काही न सुचणे


47) फडशा पाडणे - संपवणे


48) गोरेमोरे होणे - लाज वाटणे


49)आकशाला गवसणी घालणे - अशक्य गोष्ट करुन पाहणे


50)धिंडवडे निघणे - फजिती होणे


61) आटापिटा करणे - खूप कष्ट करणे


62)माया पातळ होणे - प्रेम कमी होणे


63) वाऱ्यावर सोडणे - काही न विचारणे


64)हातपाय गाळणे - धीर सोडणे


65) कागदी घोडे नाचवणे - कृतिशील


 काम न करता कागदी पराक्रम गाजविणे


66) गुळणी फोडणे - स्पष्ट सांगणे


67)झाकड पडणे - अंधार पडणे


68)पोटात आग पडणे - खूप भूक लागणे


69)टोपी उडवणे - टवाळी करणे


70)पाणी पाजणे - पराभव करणे


71)वहिवाट असणे - रीत असणे


72)छी थू होणे - नाचक्की होणे


73)प्रादूर्भूत होणे - दिसू लागणे


74)दंडेली करणे - जबरदस्ती करणे


75)दिवा विझणे - मरण येणे


76)मूठमाती देणे - शेवट करणे


77) सुगावा लागणे - अंदाज लागणे


78)प्रतारणा करणे - फसवणूक करणे


79)डोक्यावर घेणे - कौतुक करणे


80)कानाशी लागणे - चहाडी करणे


81)किटाळ करणे - आरोप होणे


82)देव्हारे माजविणे - महत्व वाढविणे


83)हातावर तुरी देणे - फसविणे


84)बेगमी करणे - साठा करणे


85)सोन्याचा धूर निघणे - चांगली स्थिती येणे

No comments:

Post a Comment