🔸कद्रीय लोकसेवा आयोगाचे सदस्य, प्रा. (डॉ) प्रदीपकुमार जोशी यांनी 7 ऑगस्ट 2020 रोजी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) अध्यक्षपदाची शपथ घेतली. आयोगाचे मावळते अध्यक्ष अरविंद सक्सेना यांनी जोशी यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली.
🔸परा. जोशी यांनी 12 मे 2015 रोजी सदस्य म्हणून UPSC आयोगामध्ये प्रवेश केला. यापूर्वी जोशी त्यांनी छत्तीसगड लोकसेवा आयोग आणि मध्य प्रदेश लोकसेवा आयोगाचे अध्यक्षपद भूषवले. त्यांनी राष्ट्रीय शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्था (NIEPA) याचे संचालक म्हणूनही काम पाहीले. ते आर्थिक व्यवस्थापन क्षेत्रातले एक नामवंत तज्ज्ञ आहेत.
केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) विषयी
🔸कद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) ही भारताची केंद्रीय निवड संस्था आहे. हा एक संवैधानिक आयोग आहे. ही संस्था अखिल भारतीय सेवा तसेच केंद्रीय सेवेच्या गट 'अ' व गट 'ब' कर्मचाऱ्यांची निवड करण्याकरीता जबाबदार आहे. ही संस्था 'कर्मचारी, लोक तक्रारी आणि निर्वाहभत्ता मंत्रालयातल्या कर्मचारी व प्रशिक्षण विभागाच्या अधिपत्याखाली येतो.
🔸सस्थेची स्थापना दिनांक 1 ऑक्टोबर 1926 रोजी झाली. आयोगामध्ये एक अध्यक्ष आणि दहा सदस्य असतात. त्यांची नियुक्ती भारताचे राष्ट्रपती यांच्याकडून केली जाते. UPSC च्या अध्यक्ष पदाची नियुक्ती भारताच्या संविधानातली कलम 316 च्या उपखंड (1) अन्वये केली जाते.
No comments:
Post a Comment