Monday, 14 September 2020

टपाल विभागाची ‘पंचतारांकित गावे’ योजना.


♒️10 सप्टेंबर 2020 रोजी भारतीय टपाल विभागाच्या ‘पंचतारांकित गावे’ (Five Star Villages) योजनेचे उद्घाटन झाले. टपाल विभागाच्या योजना देशातल्या संपूर्ण ग्रामीण भागात पोहचाव्यात हा या योजनेचा हेतु आहे.

♒️टपाल विभाग अनेक उत्पादने आणि सेवा पुरवते, मात्र ते खेड्यांपर्यंत पोहोचत नाहीत. म्हणूनच अशी सर्व उत्पादने आणि सेवा ग्रामीण स्तरावर उपलब्ध करुन देण्यासाठी ही योजना तयार करण्यात आली आहे.

💢योजनेविषयी...

♒️शाखा कार्यालये त्यांच्या टपालविषयक गरजा पूर्ण करण्यासाठी 'वन स्टॉप शॉप' म्हणून काम करणार.

♒️खड्यातल्या प्रत्येक घरात टपाल योजनांची 100 टक्के व्याप्ती सुनिश्चित करणे हे पंचतारांकित गाव योजनेची संकल्पना आहे. कोणत्याही गावाने खालीलपैकी चार योजना पूर्ण केल्या तर त्या गावाला चार तारांकित दर्जा मिळतो, जर कोणत्याही खेड्यातून तीन योजना पूर्ण झाल्या तर त्या गावाला तीन तारांकित दर्जा मिळतो.

♒️परारंभी, महाराष्ट्रात प्रायोगिक तत्वावर ही योजना राबविण्यात येणार आहे. त्यानंतर त्या अनुभवाच्या धर्तीवर संपूर्ण देशभरात या योजनेची अंमलबजावणी केली जाणार.
सुरुवातीला महाराष्ट्रातल्या प्रत्येक प्रांतासाठी दोन ग्रामीण जिल्ह्यांची निवड पुढीलप्रमाणे केली आहे - अकोला, वाशीम (नागपूर विभाग), परभणी, हिंगोली (औरंगाबाद विभाग), सोलापूर, पंढरपूर (पुणे विभाग), कोल्हापूर, सांगली (गोवा विभाग), मालेगाव, पालघर (नवी मुंबई विभाग).

♒️2020-2021 या आर्थिक वर्षात प्रत्येक जिल्ह्यातली 50 गावे समाविष्ट केली जाणार. प्रादेशिक कार्यालये पंचतारांकित गावे अंतर्गत समाविष्ट करावयाच्या गावांची निवड करणार.

♒️सर्व योजनांसाठी जनजागृती मोहीम राबवून आणि पात्र ग्रामस्थांना एकत्र करून नेमण्यात आलेला टपाल गट घरोघरी भेट देणार. त्याचप्रमाणे पंचायत कार्यालये, शाळा, ग्रामीण दवाखाने, बस आगार, बाजारपेठ इत्यादी सर्व प्रमुख ठिकाणी नोटिस बोर्ड लावले जाणार.

💢टपाल योजना....

♒️बचत बँक खाते (बचत खाता / आवर्ती ठेव / मुदत ठेव / मासिक उत्पन्न योजना (MIS) किंवा राष्ट्रीय बचत योजना (NSC) / कृषी विकास पत्र)
सुकन्या समृद्धि खाते / PPF खाते
वित्त पोषित पोस्ट ऑफिस बचत खात्याशी संलग्न केलेले IPPB खाते
टपाल जीवन विमा / ग्रामीण टपाल जीवन विमा योजनापंतप्रधान सुरक्षा विमा योजना / पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना

💢भारतीय टपाल विभाग...

♒️‘इंडिया पोस्ट’ या नावाखाली व्यवहार करणारे टपाल विभाग, ही भारत सरकारची टपाल प्रणाली आहे जी दळणवळण मंत्रालयाची उपसंस्था आहे. ही जगातली सर्वाधिक प्रमाणात विस्तारलेली टपाल प्रणाली आहे. 01 ऑक्टोबर 1854 रोजी लॉर्ड डलहौजी यांनी संस्थेची स्थापना केली. त्याचे मुख्यालय नवी दिल्लीत आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...