Thursday, 3 September 2020

हिंद-प्रशांत प्रदेशात पुरवठा साखळींचा लवचिकपणा वाढविण्यासाठी भारत, ऑस्ट्रेलिया आणि जापान या देशांचा पुढाकार



🔰भारताचे वाणिज्य व उद्योग मंत्री पियुष गोयल, ऑस्ट्रेलियाचे व्यापार मंत्री सायमन बर्मिंगहॅम आणि जापानचे अर्थ मंत्री काजियामा हिरोशी या मंत्र्यांची 1 सप्टेंबर 2020 रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून एक बैठक झाली.

🔰एक मुक्त, निष्पक्ष, सर्वसमावेशक, भेदभाव नसलेला, पारदर्शक, आणि स्थिर व्यापार आणि गुंतवणुकीचे वातावरण देत आणि आपल्या बाजारपेठा खुल्या ठेवण्यात पुढाकार घेण्याचा दृढ निश्चिय मंत्र्यांनी व्यक्त केला. कोविड–19 संकट आणि आर्थिक आणि तंत्रज्ञानाच्या पटलावर नुकत्याच झालेल्या जागतिक पातळीवरील बदलांच्या पार्श्वभूमीवर मंत्र्यांनी हिंद-प्रशांत प्रदेशात पुरवठा साखळींचा लवचिकपणा वाढविण्याची गरज आणि क्षमता यावर जोर दिला

🔰हिंद-प्रशांत प्रदेशामधील पुरवठा साखळीच्या लवचिकतेबाबत प्रादेशिक सहकार्याची आवश्यकता ओळखून मंत्र्यांनी सहकार्याच्या माध्यमातून उद्दिष्ट साध्य करण्यासाठी नवीन उपक्रम सुरू करण्याच्या दिशेनी काम करण्याचा आपला हेतू यावेळी सामायिक केला.

🔰2019 साली संचयी मालाचा व्यापार करताना, भारताचे संचयी सकल राष्ट्रीय उत्पादन 9.3 लक्ष कोटी (ट्रिलियन) डॉलर इतके आणि सेवा व्यापार अनुक्रमे 2.7 लक्ष कोटी डॉलर आणि 0.9 लक्ष कोटी डॉलर होता.

🔰ऑस्ट्रेलिया पृथ्वीच्या दक्षिण गोलार्धातील एक खंड आणि देश आहे. याच्या भूभागात ऑस्ट्रेलिया खंड, तास्मानिया बेट व हिंदी महासागर व पॅसिफिक महासागरातील अनेक छोट्या बेटांचा समावेश होतो. कॅनबेरा ही राष्ट्रीय राजधानी आहे. ऑस्ट्रेलियन डॉलर हे राष्ट्रीय चलन आहे.

🔰जापान हा पूर्व आशियामधील एक द्वीप-देश आहे. टोकियो ही राष्ट्रीय राजधानी आहे. जापानी येन हे राष्ट्रीय चलन आहे.

No comments:

Post a Comment