· हा संसर्गजन्य आजार असून तो 'मायक्रोबॅक्टेरियम' ट्युबरक्युलोसिंस' या जिवाणूमुळे होतो.
· या जिवाणूचा शोध 'सर रॉबर्ड कॉक' यांनी 24 मार्च 1882 रोजी लावला म्हणून 'कॉक्स इन्फेक्शन' असेही म्हणतात.
· जागतिक क्षयरोग दिन 24 मार्च रोजी साजरा करण्यात येतो.
· क्षयरोगचा प्रसार हवेमार्फत (रुग्णाच्या खोकण्याने, शिकण्याने) होतो.
· क्षयरोगाचे जंतू मुख्यतः फुप्फुसावर परिणाम करतात म्हणून फुप्फुसाच्या क्षयरोगाचे प्रमाण सर्वात जास्त आहे.
क्षयरोगाचे प्रकार :
1. फुप्फुसाचा 2. इतर अवयवांचा (ग्रंथी, हाडे/सांधे, मूत्रपिंड, मेंदूआवरण, आतड्यांचा, कातडीचा इ.)
क्षयरोगाची लक्षणे :
1. तीन आठवडे किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीचा खोकला,
2. हलकासा परंतु संध्याकाळी वाढणारा ताप
3. वजन कमी होणे
4. थुंकीतून रक्त पडणे
5. भूक मंदावणे इ.
क्षयरोगाचे निदान :
लहान मुलांमधील क्षयरोग निदानासाठी 'मोन्टोक्स टेस्ट' वापरली जाते.
1. थुंकी तपासणी (बेडका) : सर्वात खात्रीशीर, कमी खर्चाची पद्धत. संशयित रुग्णाच्या थुंकीचे तीन नमुने तपासण्यात येतात.
2. 'क्ष-किरण' तपासणी (X-Ray) : छातीचा एक्स-रे काढून करतात. वरील तपासणीपेक्षा कमी खात्रीशीर. विशिष्ट तज्ञांची आवश्यकता असते.
प्रतिबंधक लस -
0 ते 1 वर्ष बालकांना क्षयरोग प्रतिबंधक लस टोचण्यात येते. त्या लसीला 'बी.बी.सी' (बॅसिलस कॉलमेटग्युरिन) असे म्हणतात.
राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम 1962 साली सुरू करण्यात आला. या कार्यक्रमामध्ये एक्स-रे तपासणीवर जास्त भर
होता तसेच औषधोपचाराचा कालावधी जास्त होता.(दीर्घ मुदतीचा)
सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम (RNTCP) सन 1992-93 मध्ये सुरू करण्यात आला.
क्षयरोग औषधोपचार :
सुधारित कार्यक्रमामध्ये क्षय रुग्णांना प्रत्यक्ष देखरेखीखाली चार प्रकारच्या गोळ्या तसेच 'स्ट्रेप्टोमायसीन' हे इन्जेक्शन देण्यात येते.
1. सदर औषधोपचार पद्धतीला डॉट्स (DOTS) असे म्हणतात.
2. DOTS - Directly Observed Treatment With Short Cource Cheniotherapy (प्रत्यक्ष निरीक्षणाखाली दिलेल्या अल्प मुदतीचा क्षयरोग औषधोपचार)
No comments:
Post a Comment