Saturday, 26 September 2020

तामिळनाडूमध्ये भारतातली न्यूट्रिनो वेधशाळा उभारली जाणार

 तामिळनाडूमध्ये भारतातली न्यूट्रिनो वेधशाळा उभारली जाणार


तामिळनाडू राज्याच्या थाटी जिल्ह्यात बोडी वेस्ट हिल्सच्या परिसरात भारतातली न्यूट्रिनो वेधशाळा उभारली जाणार आहे.


ठळक बाबी


तिथे पृथ्वीच्या वातावरणात तयार होणाऱ्या न्यूट्रिनो कणांचे निरीक्षण केले जाणार. त्याद्वारे न्यूट्रिनो कणांच्या गुणधर्मांबद्दल अधिक माहिती गोळा केली जाणार.


‘न्यूट्रिनो डिटेक्टर’ हे एक ‘मॅग्नेटाईज्ड आयर्न कॅलोरीमीटर’ उपकरण असते. कोणत्याही देशाच्या तुलनेत भारतात सर्वाधिक वजनी उपकरण तयार केले जाणार आहे.


वेधशाळा जमिनीच्या खाली तयार केली जाणार आहे.प्रकल्पाला अणुऊर्जा विभाग आणि विज्ञान व तंत्रज्ञान विभाग वित्तपूरवठा करणार आहेत.


न्यूट्रिनो म्हणजे काय?


न्यूट्रिनो हे ब्रह्मांड तयार करणारे आकाराने सर्वात छोटे कण असतात. न्यूट्रिनो नावाप्रमाणेच विद्युतदृष्ट्या तटस्थ असतात आणि त्याचे वस्तुमान इतर कोणत्याही ज्ञात कणांपेक्षा शून्यसमान अगदीच कमी असते.


सूर्य आणि पृथ्वीचे वातावरण ही न्यूट्रिनो कणांचे मुख्य स्रोत आहेत.


न्यूट्रिनो वेधशाळा कॅनडा, जापान आणि इटली या देशांमध्ये जमिनीखाली तर अंटार्क्टिका व फ्रान्स या देशांमध्ये समुद्राखाली आहेत.

No comments:

Post a Comment