Tuesday, 27 August 2024

राज्यसेवा पूर्व परीक्षा : विस्तृत अभ्यासक्रम



राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये सामान्य अध्ययन आणि नागरी सेवा कल चाचणी (सी-सॅट) असे 2 पेपर असतात. त्यांचा अभ्यासक्रम विस्तृत स्वरूपात पाहुयात.

पेपर 1 : सामान्य अध्ययन ( गुण: 200, वेळ : 2 तास )

▪️ इतिहास : यामध्ये प्राचीन, मध्ययुगीन तसेच आधुनिक इतिहासाची माहिती असणे आवश्यक आहे. तसेच भारताच्या इतिहासाबरोबरच महाराष्ट्राचा प्राचीन, मध्ययुगीन व आधुनिक इतिहास अवगत असणे गरजेचे आहे.

▪️ भगोल : भारत आणि महाराष्ट्राच्या भूगोलाबरोबरच जगाच्या भूगोलाचा अभ्यास. त्यातही प्राकृतिक, आर्थिक आणि सामाजिक स्तर, लोकसंख्या इत्यादी मुद्दे अभ्यासावे लागणार आहे.

▪️ भारतीय राज्यव्यवस्था व कारभारप्रक्रिया : यात राज्यघटना, राजकीय व्यवस्था, पंचायती राज, सार्वजनिक धोरण आणि नागरिकांचे हक्क इ. मुद्दे, भारतीय तसेच महाराष्ट्राच्या राज्यव्यवस्थेचा अभ्यास करावा लागणार आहे.

▪️ आर्थिक आणि सामाजिक विकास : शाश्वत विकास, दारिद्रय़, लोकसंख्याशास्त्र, सामाजिक क्षेत्रातील पुढाकार, समावेशक विकास इ. मुद्दे यामध्ये आहेत. महाराष्ट्राच्या संदर्भातही हा घटक अभ्यासावा लागणार.

▪️ पर्यावरण : पर्यावरणीय परिस्थितिकी, जैवविविधता आणि हवामान बदल यासंबंधी सर्वसाधारण मुद्दे

▪️ सामान्य विज्ञान : सामान्य विज्ञानासाठी आठवी ते बारावी विज्ञानाची पुस्तके वाचावीत.

👉 पपर 2 :  नागरी सेवा कल चाचणी (सी-सॅट) ( गुण: 200, वेळ: 2 तास )

▪️ इटरपर्सनल स्किल्स : सरकारमध्ये उच्चपदावर काम करताना अनेक व्यक्ती , संस्था , राजकारणी , अधिकारी , कर्मचारी इत्यादींशी नेहमी संपर्क येत असतो. त्यामुळे इंटरपर्सनल स्किल्स आणि कम्युनिकेशन स्किल्सविषयी माहिती असणे आवश्यक असते

▪️ तर्कशुद्ध युक्तिवाद आणि मीमांसा / पृथ:करण क्षमता : तर्कशुद्ध विचार किंवा युक्तिवाद तसेच एखाद्या गोष्टींची मीमांसा व अनुमान काढण्याची क्षमता यामध्ये तपासली जाते.

▪️निर्णय क्षमता व प्रश्नांची उकल : प्रशासकीय अधिकारी म्हणून योग्य निर्णयक्षमता तसेच विविध प्रश्नांना हाताळण्याची क्षमता या घटकांमधून पडताळली जाते.

▪️ सामान्य बुद्धिमापन क्षमता : यामध्ये काळ, काम, वेग, गुणोत्तर, कोडिंग, डिकोडिंग, प्रोबॅबिलिटी, घड्याळ, कॅलेंडर, दिशा आदींवर आधारित प्रश्न असतात.

▪️ बसिक न्यूमरसी, डेटा इंटरप्रिटेशन : यामध्ये आकड्यांमधील संबंध ओळखून क्रम किंवा रिक्त स्थानं भरणं, लसावि / मसाविवर आधारित प्रश्न, सरासरी, वयांचे गुणोत्तर नफा-तोटा, क्षेत्रफळ, आकारमान, प्रोबॅबिलिटी, आकृती, ग्राफ, टेबल्स यांवर आधारित प्रश्न असतात.

▪️ इग्लिश व मराठी भाषा आकलन क्षमता : उताऱ्यावर प्रश्न, पॅराग्राफ उलटेसुलटे करुन त्याची संगती लावणं, वाक्यरचना ओळखणं, योग्य शब्दाची निवड करणं, समानार्थी-विरुद्धार्थी शब्द लिहीणं अशा अनेक गोष्टी त्यात येतात.

No comments:

Post a Comment