Saturday, 26 September 2020

वाचा :- मराठी व्याकरण



🔴 परयोग व त्याचे प्रकार  


प्रयोग व त्याचे प्रकार (Voice And Its Types):


वाक्यातील कर्ता, कर्म, व क्रियापद यांच्या परस्पर संबंधाला प्रयोग असे म्हणतात.


मराठीत प्रयोगाचे तीन प्रकार पडतात.

1. कर्तरी प्रयोग 

2. कर्मणी प्रयोग 

3. भावे प्रयोग 


1. कर्तरी प्रयोग (Active Voice) : जेव्हा क्रियापदाचे रूप हे कर्त्याच्या लिंग किवा वाचनानुसार बदलत असेल तर त्या प्रयोगास कर्तरी प्रयोग (Active Voice) असे म्हणतात.

उदा . तो चित्रा काढतो. (कर्ता- पुल्लिंगी) 

       ती चित्र काढते. (कर्ता- लिंग)

       ते चित्र काढतात. (कर्ता- वचन)


कर्तरी प्रयोगाचे दोन उपप्रकार पडतात.

1. सकर्मक कर्तरी प्रयोग 

2. अकर्मक कर्तरी प्रयोग 


1. सकर्मक कर्तरी प्रयोग : ज्या कर्तरी प्रयोगाच्या वाक्यात कर्म आलेले असेल तेव्हा त्यास सकर्मक कर्तरी प्रयोग असे म्हणतात.

उदा . राम आंबा खातो.

       सीता आंबा खाते. (लिंग)

       ते आंबा खातात. (वचन)



2. अकर्मक कर्तरी प्रयोग : ज्या कर्तरी प्रयोगाच्या वाक्यात जेव्हा कर्म आलेले नसते तेव्हा त्यास अकर्मक कर्तरी प्रयोग असे म्हणतात.

उदा . राम पडला 

       सिता पडली (लिंग)

       ते पडले (वचन)    


2. कर्मणी प्रयोग (Passive Voice) : क्रियापदाचे रूप कर्माच्या लिंग किवा वचनानुसार बदलते तर त्यास कर्मणी प्रयोग (Passive Voice) असे म्हणतात.

उदा . राजाने राजवाडा बांधला. (कर्म- पुल्लिंगी)

       राजाने कोठी बांधली. (कर्म- लिंग)

       राजाने राजवाडे बांधले. (कर्म- वचन)



कर्मणी प्रयोगाचे पाच उपप्रकार पडतात.

1. प्राचीन कर्मणी प्रयोग / पुराण कर्मणी प्रयोग  

2. नवीन कर्मणी प्रयोग 

3. समापन कर्मणी प्रयोग 

4. शक्य कर्मणी प्रयोग 

5. प्रधान कर्तुक कर्मणी प्रयोग


1. प्राचीन कर्मणी प्रयोग / पुराण कर्मणी प्रयोग : हा प्रयोग मूल संस्कृत कर्मणी प्रयोगापासून तयार झालेला आहे तसेच या कर्माच्या उदाहरनातील वाक्य संस्कृत मधील कवीरूपी आढळतात.                

उदा. नळे इंद्रास असे बोलीले.

      जो - जो किजो परमार्थ लाहो.


2. नवीन कर्मणी प्रयोग :  ह्या प्रयोगात इंग्लिश मधील Passive Voice प्रमाणे वाक्याची रचना आढळते. तसेच वाक्याच्या सुरवातीला कर्म येते व कर्त्या कडून प्रत्यय लागतात.

उदा . रावण रमाकडून मारला गेला.

       चोर पोलिसांकडून पकडला गेला.



3. समापण कर्मणी प्रयोग : जेव्हा कर्मणी प्रयोगाच्या वाक्याच्या क्रियापदाचा अर्थ क्रिया समाप्त झाल्यासारखा असतो तेव्हा त्यास समापण कर्मणी प्रयोग असे म्हणतात.

उदा . त्याचा पेरु खाऊन झाला.

       रामाची गोष्ट सांगून झाली.



4. शक्य कर्मणी प्रयोग : जेव्हा कर्मणी प्रयोगतील वाक्याच्या क्रियापदाचा अर्थ कर्त्यामध्ये ती क्रिया करण्याची शक्यता असल्यासारखा असतो, दिसतो तेव्हा त्या प्रयोगास शक्य कर्मणी प्रयोग असे म्हणतात.

उदा . आई कडून काम करविते.

       बाबांकडून जिना चढविता.


5. प्रधान कर्तुत कर्मणी प्रयोग : कर्मणी प्रयोगाच्या वाक्यात जेव्हा कर्ता प्रथम मानला जातो तेव्हा त्या प्रयोगास प्रधान कर्तुक कर्मणी प्रयोग असे म्हणतात.

उदा . त्याने काम केले. 

       तिने पत्र लिहिले.  



3. भावे प्रयोग : जेव्हा कर्त्याच्या किवा कर्माच्या लिंग किवा वाचनात बदल करूनही क्रियापद बदलत नाही तेव्हा त्या प्रयोगास भावे प्रयोग असे म्हणतात.

उदा . सुरेशने बैलाला पकडले.

       सिमाने मुलांना मारले.    


भावे प्रयोगाचे तीन उपप्रकर पडतात. 


1. सकर्मक भावे प्रयोग :

2. अकर्मक भावे प्रयोग :

3. अकर्तुक भावे प्रयोग :


1. सकर्मक भावे प्रयोग : ज्या भावे प्रयोगाच्या वाक्यात कर्म आलेले असल्यास त्यास सकर्मक भावे प्रयोग म्हणतात.

उदा. शिक्षकाने विद्यार्थ्यांना शिकविले.

      रामाने रावणास मारले.


2. अकर्मक भावे प्रयोग : ज्या भावे प्रयोगाच्या वाक्यात कर्म आलेले नसल्यास त्यास अकर्मक भावे प्रयोग असे म्हणतात.

उदा . मुलांनी खेळावे.

       विद्यार्थांनी जावे.


3. अकर्तुक भावे प्रयोग : भावे प्रयोगाच्या वाक्यात कर्ता आलेला नसेल तेव्हा त्यास अकर्तुक भावे प्रयोग असे म्हणतात.

उदा . आता उजाडले.

       शांत बसावे.

       आज सारखे उकडते.

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...