Thursday, 3 September 2020

चारू सिन्हा आता श्रीनगर सेक्टरमध्ये सीआरपीएफच्या महानिरीक्षक.



🔰शरीगरमधील दहशतवाद्यी कारवायांच्या बिमोड करण्यासाठी आता सीआरपीएफने प्रथमच एका महिला अधिकाऱ्याकडे दहशतवाद विरोधी अभियानाचे नेतृत्व करण्याची संधी दिली आहे.

🔰सन 1996 च्या बॅचमधील तेलंगण केडरच्या आयपीएस अधिकारी चारू सिन्हा आता श्रीनगर सेक्टरमध्ये सीआरपीएफच्या महानिरीक्षक (आयजी) म्हणून काम पाहणार आहेत.या अगोदर देखील चारू सिन्हा यांना अशाचप्रकारच्या कठीण कामासाठी जबाबदारी देण्यात आलेली आहे.

🔰सीआरपीएफच्या आयजी म्हणून त्यांनी बिहारमध्ये नक्षलवाद्या अभियानाचे नेतृत्व करत, नक्षलवाद्याचा बिमोड केला आहे.
त्यांच्या नेतृत्वात नक्षलवादाविरोधात अनेक अभियान यशस्वीरित्या राबवले गेले आहेत. त्यानंतर त्यांची बदली जम्मू येथे बीएसएफच्या आयजी म्हणून झाली.

🔰या ठिकाणी देखील त्यांनी यशस्वीपणे कामगिरी पार पाडली. त्यांच्या कामगिरी पाहून आता त्यांना दहशतवाद्याचा बिमोड करण्यासाठी श्रीनगर सेक्टरच्या आयजी पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.या अगोदर श्रीनगर सेक्टरच्या आयजी पदाची जबाबदारी एपी माहेश्वरी यांच्याकडे होती.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...