Thursday, 17 September 2020

राष्ट्रपतीच्या निवडणुकीत आता जम्मु आणि काश्मिरचा समावेश असेल का?



🔸जम्मु आणि काश्मिर केंद्र शासित प्रदेश होण्याअगोदर ते राष्ट्रपतींच्या निवडणुकीत भाग घेत होते.


🔸आता मात्र ते राज्य नसुन केंद्र शासित प्रदेश आहे. त्यामुळे त्याचा समावेश या निवडणुकीत समावेश होत नाही. 


🔸जर जम्मु आणि काश्मिरचा समावेश राष्ट्रपतींच्या निर्वाचण गणात (Electrol college) करायचा असेल तर कलम 54 मध्ये घटनादुरुस्ती करावी लागेल. 


🔸सविधान कलम 54 मध्ये राष्ट्रपतींच्या निर्वाचण गणाची तरतुद आहे.


🔸70 वी घटनादुरुस्ती करुन ज्या प्रकारे “दिल्ली आणि पुदुचेरी” चा समावेश राष्ट्रपतींच्या निर्वाचण गणात केला तसा जम्मु आणि काश्मिरचा करावा लागेल.


🔸राष्ट्रपतींच्या निवडणुक पद्धतीत बदल करण्यासाठी 2/3 विशेष बहुमत व निम्या राज्यांची संमती लागेल.

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...