🔰नवी दिल्ली : कृषी विधेयकांवरून रविवारी राज्यसभेत प्रचंड गदारोळ झाला. विरोधकांच्या गोंधळात, घोषणाबाजीत दोन्ही कृषीविषयक विधेयके राज्यसभेत आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आली. या गोंधळावरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.
🔰शतकरी उत्पादने व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन व सुविधा), शेतकरी (हक्क आणि सुरक्षा) किंमत हमी व कृषी सेवा करार ही विधेयके रविवारी राज्यसभेत मंजूर झाली. ही विधेयके लोकसभेत आधीच मंजूर झाल्याने कायद्यात रूपांतर होण्यासाठी ती स्वाक्षरीसाठी राष्ट्रपती रामनाथ कोिवद यांच्याकडे पाठवली जातील.
🔰लोकसभेत सत्ताधारी भाजपकडे बहुमत असल्याने ही विधेयके विनासायास मंजूर झाली. पण, राज्यसभेत भाजपकडे संख्याबळ नव्हते. त्यामुळे घाईघाईने आवाजी मतदानाने विधेयके मंजूर करून घेण्याचा कुटिल डाव आखला गेल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसचे डेरेक ओब्रायन यांनी केला.
No comments:
Post a Comment