Tuesday, 29 September 2020

भोपाळ वायुगळती ही शतकातली सर्वात भीषण औद्योगिक घटना होती: संयुक्त राष्ट्रसंघ....


✍️सयुक्त राष्ट्रसंघाची कामगार संस्था आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने (ILO) “द सेफ्टी अँड हेल्थ अॅट द हार्ट ऑफ द फ्यूचर वर्क - बिल्डिंग ऑन 100 इयर्स ऑफ एक्स्पीरियन्स” हा अहवाल प्रसिद्ध केला आहे. 


✍️दरवर्षी औद्योगिक ठिकाणच्या दुर्घटना किंवा कामादरम्यान झालेल्या आजारामुळे किमान 27.8 लक्ष कामगारांचा मृत्यू होतो, असा दावा अहवालाद्वारे करण्यात आला आहे.


✍️सयुक्त राष्ट्रसंघाच्या अहवालात हजारो लोकांना मृत्यूच्या दाढेत लोटणाऱ्या 1984 सालाच्या ‘भोपाळ वायुगळती’ घटनेला शतकातली सर्वात भीषण औद्योगिक घटना म्हणून नोंदवण्यात आले आहे.


✍️मध्यप्रदेशाच्या राजधानीत ‘युनियन कार्बाइड’ या किटकनाशके बनविण्याच्या प्रकल्पात मिथाइल आयसोसायनेट (मिक) वायूची गळती होऊन किमान 6 लाखांहून अधिक मजूर व परिसरातल्या रहिवाशांना फटका बसला होता.


 ✍️तयात सरकारी आकड्यानुसार 15 हजारांवर लोकांचा मृत्यू झाला होता. विषारी कण अजूनही अस्तित्वात आहेत.


✍️ तयामुळे हजारो पीडित व त्यांची पुढची पिढी श्वसनासंबंधी आजाराचा सामना करत आहे.


✍️1919 सालानंतर भोपाळ वायुगळती ही जगातली सर्वात भीषण वायुगळतीची घटना ठरते. 


✍️1919 सालानंतर इतर नऊ औद्योगिक घटनांमध्ये फुकुशिमा किरणोत्सर्ग तसेच ढाकाच्या राणा प्लाझा इमारत कोसळण्याच्या घटनांचाही अहवालात समावेश करण्यात आला आहे.


✍️ अहवालानुसार जगभरात 36% कामगारांना आठवड्याला 48 तासांहून जास्त वेळ काम करावे लागत आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

चालू घडामोडी :- 02 जानेवारी 2025

◆ लीना नायर(कोल्हापूर) यांना ब्रिटिश एम्पायरच्या न्यू इयर ऑनर्स यादीमधील 'कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर' (CBE) हा प्रतिष्ठे...