· वाक्यातील नाम किंवा सर्वनाम यांना वाक्यातील इतर शब्दां शी असणारा संबंध दर्शविणार्या अविकारी शब्दाला शब्दयोगी अव्यय असे म्हणतात.
· शब्दयोगी अव्यव नेहमी एखाद्या नामाला किंवा नामाचे कार्य करणार्या शब्दाला जोडूनच येतात.
· शब्दयोगी अव्ययवाचे पंधरा प्रकार पडतात.
2. स्थलवाचक :
· आत, बाहेर, अलीकडे, पलीकडे, मध्ये, समोर, जवळ, ठायी, पाशी, समक्ष, समीप, नजीक इ.
· उदा. 1. पुस्तक टेबलाजवळ ठेवले आहे.
2. घरामध्ये मोठा साप घुसला आहे.
4. हेतुवाचक :
· करिता, साठी, कारणे, अर्थी, प्रीत्यर्थी, निमित्त, स्तव इ.
· उदा. 1. यश मिळविण्याकरिता मेहनत लागते.
2. जगण्यासाठी अन्न हवेच.
5. व्यतिरेकवाचक :
· विना, शिवाय, खेरीज, परवा, वाचून, व्यतिरिक्त
· उदा. 1. तुझ्याशिवाय माला करमत नाही.
2. त्याच्या खेरीज दूसरा कोणताही चालेल.
6. तुलनात्मक :
· पेक्षा, तर, तम, मध्ये, परिस इ.
· उदा. 1. माणसांपेक्षा मेंढरं बारी.
2. गावामध्ये केशर सर्वात हुशार आहे.
7. योग्यतावाचक :
· समान, सम, जोगा, सारखा, योग्य, प्रमाणे इ.
· उदा. 1. तो ड्रेस माझा सारखा आहे.
2. आम्ही दोघे समान उंचीचे आहोत.
8. संग्रहवाचक :
· सुद्धा, देखील, ही, पण, केवळ, फक्त,इ.
· उदा. 1. मी देखील त्या कार्यक्रमात सहभागी होईल.
2. रामही भक्तासाठी धावून येईल.
9. कैवल्यवाचक :
· च, ना, मात्र, पण, फक्त, केवळ इ.
· उदा. 1. विराटच आपला सामना जिंकवेल.
2. किरण मात्र आपल्या सोबत येणार नाही.
10. संबंधवाचक :
· विशी, विषयी, संबंधी इ.
· उदा. 1. देवाविषयी आपल्या मनात फार भक्ति आहे.
2. त्यासंबंधी मी काहीच बोलणार नाही.
11. संबंधवाचक :
· संगे, सह, बरोबर, सकट, सहित, निशी, सवे, समवेत इ.
· उदा. 1. त्याने सर्वांबरोबर जेवण केले.
2. आमच्या सह तो पण येणार आहे.
12.विनिमयवाचक :
· बद्दल, एवजी, जागी, बदली इ.
· उदा. 1. त्याच्या जागी मी खेळतो.
2. सूरजची बदली पुण्याला झाली.
13. दिकवाचक :
· प्रत, प्रती, कडे, लागी इ.
· उदा. 1. या पेपरच्या दहाप्रत काढून आण.
2. त्याच्याकडे पैसे दिले आहेत मी.
14. विरोधवाचक :
· विरुद्ध, वीण, उलटे, उलट इ.
· उदा. 1. भारताविरुद्ध आज पाकिस्तानची मॅच आहे.
2. त्याने उलट माझीच माफी मागितली.
15. परिणामवाचक :
· भर
· उदा. 1. मी दिवसभर घरीच होतो.
2. राम रात्रभर शेतात पाणी भरत होता.
15. परिणामवाचक :
· भर
· उदा. 1. मी दिवसभर घरीच होतो.
2. राम रात्रभर शेतात पाणी भरत होता.
No comments:
Post a Comment