जसा कुत्रा त्याच्या वफादारीसाठी आपल्याला आवडतो तसंच मांजरदेखील अनेकांना आवडते. विशेषत: महिला वर्गाला आणि लहान मुलांना आपली ‘मनी माऊ’ खूप प्रिय असते.
● मांजर जगातील सर्वात लोकप्रिय पाळीव प्राणी आहे.
● साधारणपणे एका मांजराचं वय हे 12 ते 18 वर्षापर्यंत असतं.
● माणसाच्या शरीरात एकूण 206 हाडे असतात परंतु मांजराच्या शरीरात 280 हाडे असतात.
● जगातील सर्वात महागडी कॉफी इंडोनेशियातल्या एक प्रकारच्या वन्य जातीतल्या मांजरीच्या ‘शी’ पासून बनवली जाते.
● जगातील पहिली पाळीव मांजर 9500 वर्ष जुनी असल्याचे उघड झालं आहे.
● ‘फेलिसिटी’ नावाची फ्रेंच मांजर अवकाशात जाणारी पहिली मांजर होती. संशोधनासाठी शास्त्रज्ञांनी १९६३ साली फेलिसिटीला अवकाशात पाठवले होते.
● हिंदू शास्त्राप्रमाणे कोणत्याही व्यक्तीच्या हातून जर मांजराची हत्या झाली तर त्याला काशीला जाऊन सोन्याची मांजर घडवून त्याचे दान करावे लागते.
● एक मांजर दिवसाला साधारणपणे 16 तास झोपते. म्हणजे नऊ वर्षांची मांजर तिच्या आयुष्याचे फक्त ३ वर्ष जागी असते.
● मांजर फक्त माणसांना बघूनच म्यॅव करते. दुसऱ्या मांजराला बघून फक्त गुरगुरणे किंवा हिंसात्मक आवाज काढते.
● प्राचीन इजिप्शियन संस्कृतीत पाळीव मांजराच्या मृत्यूनंतर त्याचा रीतसर दफनविधी करण्याची प्रथा होती.
● युरोप आणि उत्तर अमेरिका भागात काळी मांजर अशुभ मानली जाते तर ब्रिटन आणि ऑस्ट्रेलिया भागात काळी मांजर चांगल्या नशिबाचं लक्षण समजली जाते.
● मांजर 1 ते 9 पिल्लांना जन्म देऊ शकते. आजतागायत सर्वात जास्त 19 पिल्लांना जन्म देण्याचा रेकॉर्ड आहे.
● मराठीत पुरुष मांजराला बोका म्हणतात आणि मांजरीला (स्त्री) भाटी म्हणतात.
No comments:
Post a Comment