🔰भारतीय खगोलशास्त्रज्ञांनी विश्वातल्या आतापर्यंतच्या सर्वात दूरवरच्या आकाशगंगेचा शोध लावून या अंतराळ शोध क्षेत्रामध्ये महत्वपूर्ण कामगिरी केली आहे. शास्त्रज्ञांनी त्याला ‘AUDFs01’ असे नाव दिले आहे.
🔴ठळक बाबी...
🔰भारताच्या ‘अॅस्ट्रोसॅट’ नामक ‘बहू-तरंगी’ अंतराळ वेधशाळेनी पृथ्वीपासून 9.3 अब्ज प्रकाशवर्ष अंतरावर असलेल्या आकाशगंगेमधून अति-अतिनील किरणे सापडली आहेत.‘इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर अॅस्ट्रॉनॉमी अँड अॅस्ट्रोफिजिक्स म्हणजेच आयुका या पुण्याच्या संस्थेच्या एका शास्त्रज्ञांच्या पथकाने डॉ. कनक साहा यांच्या नेतृत्वाखाली या आकाशगंगेचा शोध लावला आहे.
🔰या आकाशगंगेच्या मूळ शोधाचे महत्व तसेच वेगळेपण याविषयी ब्रिटनमधून प्रकाशित झालेल्या ‘नेचर अॅस्ट्रोनॉमी’ या अतिशय प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय नियतकालिकामध्ये नोंदविण्यात आले आहे.
🔴अस्ट्रोसॅट बाबत...
🔰अस्ट्रोसॅट (ASTROSAT) ही 1513 किलो वजनी भारताची पहिली समर्पित बहू-तरंगी अंतराळ वेधशाळा आहे. ISROच्या पाठिंब्याने आयुकाचे माजी प्राध्यापक श्याम टंडन यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही अंतराळ वेधशाळा विकसित केली आहे.
🔰ही मोहीम भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्यावतीने (ISRO) दिनांक 28 सप्टेंबर 2015 रोजी पाठवण्यात आली. ते समुद्रसपाटीपासून 650 कि.मी. उंचीवर पृथ्वीच्या खालच्या विषुववृत्तीय कक्षेत प्रस्थापित करण्यात आले आहे. ते एकाचवेळी विविध तरंगांमध्ये वैश्विक क्ष-किरण स्रोत आणि दूरवर असलेले तारे शोधू शकण्यास सक्षम आहे
No comments:
Post a Comment