Monday, 28 September 2020

सडे टाइम्स’चे माजी संपादक, प्रसिद्ध लेखक हॅरॉल्ड इव्हान्स यांचे निधन


🔰सडे टाइम्सचे माजी संपादक, प्रसिद्ध लेखक, स्तंभलेखक आणि शोधपत्रकार सर हॅरॉल्ड इव्हान्स यांचे न्यूयॉर्क येथे निधन झाले.

ते 92 वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने मुद्रित माध्यमांचा खंदा पुरस्कर्ता काळाच्या पडद्याआड गेला आहे.


🔰बरिटिश अमेरिकी पत्रकार असलेल्या इव्हान्स यांनी थॅलिडोमाइड या औषधाच्या दुष्परिणामांवर वृत्तमालिका चालविली होती.

नियतकालिकाचे संस्थापक, पुस्तक प्रकाशक, लेखक व अगदी शेवटी रॉयटर्सचे मानद संपादक अशा बहुविध भूमिकांतून त्यांनी काम केले होते.


🔰त 14 वर्षे संडे टाईम्सचे संपादक होते. 2003 मध्ये त्यांना ‘नाइटहूड’ म्हणजे ‘सर’ हा किताब पत्रकारितेतील सेवेसाठी देण्यात आला होता.


🔰काही काळ ते काँड नॅस्ट ट्रॅव्हलर नियतकालिकाचे संपादक होते. नंतर रँडम हाऊस या प्रकाशन कंपनीचे अध्यक्ष बनले.

प्रेस गॅझेट व ब्रिटिश जर्नालिझम रिव्ह्य़ू यांच्या जनमत चाचणीत ते सर्वात महान पत्रकार ठरले  होते.

No comments:

Post a Comment