👉परथमच, ‘ब्लू फ्लॅग’ प्रमाणपत्र मिळविण्यासाठी भारतातल्या आठ सागरी किनाऱ्यांचे नामांकन देण्यात आले आहे. ते पुढीलप्रमाणे आहेत -
👉शिवराजपूर (गुजरात), घोघला (दमण व दीव), कासारकोड आणि पादुबिद्री (कर्नाटक), कप्पड (केरळ), ऋषिकोंडा (आंध्रप्रदेश), गोल्डन बीच (ओडिशा) आणि राधानगर (अंदमान व निकोबार)
ठळक बाबी
👉दरवर्षी सप्टेंबर महिन्याचा तिसरा शनिवार हा ‘आंतरराष्ट्रीय तटिय स्वच्छता दिन’ साजरा केला जातो. यावर्षी हा दिवस 19 सप्टेंबर 2020 रोजी साजरा करण्यात आला आहे.
👉या दिनाचे औचित्य साधून केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाकडून यासंबंधी घोषणा करण्यात आली.
👉‘ब्लू फ्लॅग’ प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर त्या आठ किनाऱ्यांचा जगातल्या सर्वात स्वच्छ किनाऱ्यांच्या यादीत समावेश होणार.
"BEAMS" (सागरी किनारा पर्यावरण व सौंदर्यिकरण व्यवस्थापन सेवा)
👉हा भारत सरकारचा स्वतःचा कार्यक्रम आहे, ज्याच्याअंतर्गत स्वच्छ किनाऱ्यांना राष्ट्रीय प्रमाणपत्र बहाल केले जातात.
👉 किनारी प्रदेशात शाश्वत विकासासाठी असलेल्या धोरणांना प्रोत्साहन देण्यासाठी SICOM आणि पर्यावरण मंत्रालयाने ICZM (एकात्मिक किनारी क्षेत्र व्यवस्थापन) प्रकल्पाच्या अंतर्गत BEAM कार्यक्रम राबवत आहे.
👉 तटीय व्यवस्थापनाद्वारे किनारी आणि सागरी पर्यावरण तसेच पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने मंत्रालयाने संवादात्मक ICZM (एकात्मिक किनारी क्षेत्र व्यवस्थापन) उपक्रम राबवत आहे.
👉 ICZMची संकल्पना 1992 साली रिओ दे जनेरो येथे झालेल्या पृथ्वी शिखर परिषदेत मांडली गेली होती.
‘ब्लू फ्लॅग’ प्रमाणपत्र
🌷हा पर्यावरणाशी अनुकूल असलेल्या पर्यटनाला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने सागरी किनारा, सागरी परिसंस्था किंवा शाश्वत बोटिंग टूरिझम कार्यवाहक यांना बहाल केला जाऊ शकणारा सन्मान आहे. हा सन्मान डेन्मार्कच्या फाउंडेशन फॉर एनविरोनमेंटल एज्युकेशन (FEE) या ना-नफा संस्थेच्यावतीने दिला जातो.
No comments:
Post a Comment