🔰मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांच्या हस्ते 30 ऑगस्ट 2020 रोजी पहिल्या "रोल ऑन रोल ऑफ' (रो-रो) रेल्वे सेवेचे आभासी पद्धतीने उद्घाटन करण्यात आले. ही सेवा बंगळुरू (नेलमंगला) आणि सोलापूर (बाळे, महाराष्ट्र) या शहरांच्या दरम्यान आहे.
🔴ठळक बाबी...
🔰अत्यावश्यक वस्तूंची जलद वाहतूक करण्यासाठी रेल्वे मंडळाने एप्रिलमध्ये बंगळुरू (नेलमंगला) ते सोलापूर (बाळे, महाराष्ट्र) पर्यंत पहिल्या "रोल ऑन रोल ऑफ' (रो-रो) सेवेला मान्यता दिली होती.
🔰रो-रो सेवा मध्य रेल्वे, दक्षिण मध्य रेल्वे आणि नैर्ऋत्य रेल्वे या तिन्ही विभागात कार्यरत केली जाणार आहे. प्रत्येक फेरीसाठी सहा दिवस लागणार आहेत. हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर आवश्यक त्या राज्यामध्ये ही सेवा पोचविली जाणार आहे.
🔰रल्वे वाहतुकीद्वारे रो-रो सेवांच्या माध्यमातून मालवाहू वाहनांची वाहतूक केली जाणार आहे. एका फेरीत 42 ट्रक वाहून नेण्याची क्षमता असणार.
🔰चालक आणि एक व्यक्ती ट्रकसोबत प्रवास करू शकते. त्यांना प्रवासासाठी द्वितीय श्रेणीची तिकीटे खरेदी करावी लागणार आहेत.
🔰एकूण 682 किमी लांबीच्या रेल्वेमार्गावर 1,260 टन वाहनवाहू क्षमता असणार. प्रत्येक ट्रक किंवा लॉरीतून 30 टन मालवाहतुकीला परवानगी देण्यात आली आहे.
🔰या योजनेच्या माध्यमातून सोयीस्कर, अडथळामुक्त, स्वस्त व पर्यावरणपूरक वाहतूक करता येणार आहे. सेवेच्या माध्यमातून कृषी, उद्योग, रसायन इत्यादि क्षेत्रांना लाभ मिळणार आहे.
No comments:
Post a Comment