🏆 सर्बियाचा अव्वल टेनिसपटू नोव्हाक जोकोव्हिचने कारकीर्दीत पाचव्यांदा इटालियन खुली टेनिस स्पर्धा जिंकली. जोकोव्हिचने अंतिम फेरीत अर्जेटिनाच्या दिएगो श्वार्ट्झमनला ७-५, ६-३ असे पराभूत केले. हे विजेतेपद पटकावत पुढील आठवडय़ात सुरू होणाऱ्या फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेसाठी सज्ज असल्याचे जोकोव्हिचने सिद्ध केले.
🏆 नकत्याच झालेल्या अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत जोकोव्हिचला रागाच्या भरात अनवधानाने पंचाच्या घशावर चेंडू आदळवल्यामुळे स्पर्धेबाहेर पडावे लागले होते. त्यात भर म्हणजे उपांत्यपूर्व सामन्यात रागाच्या भरात रॅकेट जमिनीवर आदळवल्यामुळे जोकोव्हिचला पंचांकडून ताकीद देण्यात आली.
🏆 मात्र या सर्व प्रकारानंतरही जोकोव्हिचला लाल मातीवरील इटालियन स्पर्धा जिंकता आली. मात्र अंतिम फेरीतही पहिल्या सेटमध्ये जोकोव्हिच ०-३ पिछाडीवर होता. या पिछाडीनंतरही जोकोव्हिचने पहिला सेट जिंकला.
🏆 दसरा सेटही सहज जिंकत जोकोव्हिचने पाऊस सुरू होण्याच्या आतमध्ये विजेतेपदावर नाव कोरले. त्यातच श्वार्ट्झमन ही ‘एटीपी’ १००० प्रकारातील पहिलीच अंतिम लढत खेळत होता. त्याने उपांत्यपूर्व फेरीत स्पेनचा अव्वल राफेल नदालला पराभवाचा धक्का दिला होता.
No comments:
Post a Comment