Wednesday, 23 September 2020

भारतीयांच्या संशयास्पद बँक व्यवहारांवर अमेरिकेत अंकुश.



🔰नवी दिल्ली, मुंबई : आर्थिक गैरव्यवहाराचे २०१३मधील ‘ऑफशोर लिक्स’ प्रकरण, २०१५मधील ‘स्वीस लिक्स’ प्रकरण, २०१६मधील ‘पनामा पेपर्स’ प्रकरण आणि २०१७मधील ‘पॅराडाईज पेपस’ प्रकरण यांपाठोपाठ आता ‘दि इंडियन एक्स्प्रेस’ने भारतीयांचा समावेश असलेले आणखी एक आंतरराष्ट्रीय संशयास्पद आर्थिक गैरव्यवहाराचे प्रकरण उजेडात आणले आहे. ‘फिनकेन फाईल्स’ असे त्याचे नाव आहे.


🔰ह ताजे प्रकरण उघडकीस आणताना त्यातील भारतीयांचा समावेश शोधण्यासाठी दोन हजारांहून अधिक गुप्त कागदपत्रांच्या साठय़ांची तपासणी दि इंडियन एक्स्प्रेसने केली. मनी लाँड्रिंग, दहशतवाद, अंमली पदार्थाचा व्यापार किंवा आर्थिक फसवणूक केल्याचा संशय असल्याने भारतीयांच्या या संशयास्पद बँक व्यवहारांना अमेरिकी अर्थखात्याचा ‘वॉचडॉग’ असलेल्या ‘आर्थिक गुन्हे सक्तवसुली संस्थेने’ (फिनकेन) अंकुश लावला आहे. ‘फिनकेन’ने  या कागदपत्रांना ‘सस्पीशियस अ‍ॅक्टिव्हिटी रिपोटर्स’ (सार्स) असे संबोधले आहे.


🔰अशा प्रकारच्या संशयास्पद कागदपत्रांची तपासणी ‘फिनकेन’द्वारे करण्यात येते. संबंधित बँकांच्या अनुपालन अधिकाऱ्यांमार्फत आर्थिक गुन्ह्यांचा ठपका असलेल्या व्यवहारांची किंवा त्यात सामील ग्राहकांची माहिती संकलित करण्यात येते. संबंधित बँकांनीच अशा व्यवहारांबद्दल शंका घेऊन या प्रकरणांची कायदेशीर चौकशी करण्याचे सुचवले आहे. अमेरिकेच्या न्याय विभागानेही या प्रकरणांची चौकशी सुरू केली आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...