Thursday, 3 September 2020

राज्याचा महाधिवक्ता (Advocate General of The state)



संविधानात “भाग 6 मधील प्रकरण 2 अंतर्गत कलम 165 मध्ये” महाधिवक्ता पदाची तरतुद करण्यात आली आहे.

महत्वाचे म्हणजे घटनेतील “कलम 177 आणि 194” ही देखील या पदाशी संबंधित कलमे आहेत..

कलम 177नुसार, महाधिवक्ता यांना सभागृहातील हक्क दिले आहेत. यानुसार राज्याच्या महाधिवक्त्याला , राज्य विधीमंडळाच्या कोणत्याही सभागृहात, सभागृहाच्या कोणत्याही संयुक्त बैठकीत आणि ज्या समितीत त्याचे नाव सदस्य म्हणून घातलेले असेल अशा कोणत्याही समितीत, भाषण करण्याचा आणि अन्यथा त्यांच्या कामकाजात भाग घेण्याचा हक्क असेल, पण या कलमाच्या  आधारे त्याला मतदान करण्याचा हक्क असणार नाही.

कलम 194 नुसार, महाधिवक्ता यांना राज्य विधीमंडळाची सभागृहे आणि त्यांचे सदस्य व समित्या यांचे अधिकार, विशेषाधिकार, इत्यादी दिले आहेत.

No comments:

Post a Comment