Wednesday, 9 September 2020

आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन: 8 सप्टेंबर



संयुक्त राष्ट्रसंघ शिक्षण, वैज्ञानिक आणि संस्कृतिक संघटना (UNESCO) याच्या नेतृत्वात 8 सप्टेंबर या दिवशी ‘आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन’ साजरा केला जातो. या दिनी सक्रियपणे आंतरराष्ट्रीय समुदायांना एकत्र आणणे आणि व्यक्ती, समुदाय आणि संघटना यांना सक्षम बनवण्यासाठी एक साधन म्हणून साक्षरतेला प्रोत्साहन दिले जाते.

“लिटरसी टिचिंग अँड लर्निंग इन द कोविड-19 क्राईसीस अँड बियॉन्ड” या संकल्पनेखाली 2020 साली ‘आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन’ साजरा केला गेला.

पार्श्वभूमी :

संपूर्ण जगात दरवर्षी 8 सप्टेंबर या तारखेला ‘आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन’ पाळला जातो. 1965 साली या तारखेला तेहरानमध्ये शिक्षण मंत्र्यांच्या वैश्विक शिखर परिषदेच्या बैठकीत आंतरराष्ट्रीय पातळीवर शैक्षणिक कार्यक्रमावर चर्चा करण्यासाठी पहिल्यांदाच बैठक आयोजित केली गेली होती. या घटनेच्या स्मृतीत UNESCOने नोव्हेंबर 1966 मध्ये आपल्या 14व्या सत्रात 8 सप्टेंबर या तारखेला ‘आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन’ म्हणून घोषित केले.

या दिनी सक्रियपणे आंतरराष्ट्रीय समुदायांना एकत्र आणणे आणि व्यक्ती, समुदाय आणि संघटना यांना सक्षम बनवण्यासाठी एक साधन म्हणून साक्षरतेला प्रोत्साहन दिले जाते. शिवाय शिक्षणाचा प्रचार करण्यामध्ये सर्वश्रेष्ठ योगदान देणार्‍यांना साक्षरता पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते.

✅ भारतातली स्थिती :

‘जनगणना 2011’च्या अहवालानुसार, भारतात निरक्षरता दर 22 टक्के आहे. भारत जगातला सर्वाधिक साक्षर लोकसंख्या असणारा देश आहे.

2011 जनगणनेनुसार, केरळ हे 93.91 टक्क्यांसह सर्वात जास्त साक्षर असलेले राज्य ठरले. त्यापाठोपाठ लक्षद्वीप, मिझोराम, त्रिपुरा आणि गोवा या राज्यांचा क्रम लागतो.

बिहार आणि तेलंगणा या राज्यांमध्ये अनुक्रमे 63.82 टक्के आणि 66.50 टक्के याप्रमाणे सर्वात कमी साक्षरतेचे प्रमाण आढळले.

समुदायानुसार, जैन समाजात सर्वाधिक म्हणजे 86.73 टक्के लोक साक्षर आहेत, तर 13.57 टक्के अशिक्षित आहेत. सर्वाधिक निरक्षरता मुस्लिम (42.72 टक्के) समाजात आहे, त्यानंतर हिंदूमध्ये 36.40 टक्के, शीख समाजात 32.49 टक्के, बौद्ध समाजात 28.17 टक्के आणि ख्रिस्ती समाजात 25.66 टक्के याप्रमाणे निरक्षरता आहेत.

लिंग-निहाय, 61.6 टक्के पुरुष आणि 38.4 टक्के महिला यांनी पदवी किंवा त्यापुढचे शिक्षण घेतले आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...