Monday, 28 September 2020

आवर्तसारणीत 4 नवीन मूलद्रव्‍यांचा समावेश.


🅾️आवर्तसारणीत (Periodic Table) चार नवीन मूलद्रव्‍यांचा समावेश करण्‍यात आला आहे. ही नव्‍याने समावेश करण्‍यात आलेली चारही मूलद्रव्‍ये कृ्त्रिम असून, आवर्तसारणीतील सातव्‍या ओळीत त्‍यांना स्‍थान देण्‍यात आले आहे. याद्वारे सारणीतील सातवी ओळ पूर्ण झाली आहे. यापूर्वी 2011 या वर्षी 114 आणि 116व्‍या क्रमाकांचे मूलद्रव्‍य नव्‍याने समाविष्‍ट करण्‍यात आले होते.


🅾️जपान, रशिया आणि अमेरिकेच्‍या शास्‍त्रज्ञांनी या मूलद्रव्‍यांचा शोध लावला. आंतरराष्‍ट्रीय मूळ आणि उपयोजित रसायनशास्‍त्र संघटना (International Union of Pure and applied Chemistry - IUPAC) या संस्‍थेने 30 डिसेंबर 2015 रोजीच चारही मूलद्रव्‍यांची पडताळणी केली होती. सध्‍या या मूलद्रव्‍यांना त्‍यांच्‍या आवर्तसारणीतील क्रमांकानुसारच नावे देण्‍यात आली असून, त्‍यांचे येत्‍या काही दिवसांत नामकरण करण्‍यात येईल.


🅾️नव्‍याने शोधण्‍यात आलेल्‍या मूलद्रव्‍यांचे क्रमांक व सध्‍याची नावे पुढीलप्रमाणे:


1)    113 : युननट्रायम


2)    115 : युननपेंटियम


3)    117 : युननसेप्टियम


4)    118 : युननऑक्टियम


🅾️ही चारही मूलद्रव्‍ये नैसर्गिक स्थितीत अस्थिर असून, काही क्षणांतच त्‍यांचा र्‍हास होऊन त्‍यांचे इतर हलक्‍या मूलद्रव्‍यांमध्‍ये रूपांतर होते.


🧩आवर्तसारणी :-


🅾️आवर्तसारणी ही जगातील मूलद्रव्‍यांची (नैसर्गिक आणि कृत्रिम दोन्‍ही) त्‍यांच्‍या अणुक्रमांकानुसार केलेली मांडणी आहे.


🅾️1869 मध्‍ये दिमित्री मँडेलिव (Dmitri Mendeleev) या शास्‍त्रज्ञाने सर्वप्रथम आवर्तसारणी तयार केली.


🅾️मलद्रव्‍याच्‍या आवर्तसारणीतील स्‍थानावरून त्‍यांचे रासायनिक गुणधर्म, इलेक्‍ट्रॉन संरचना यांविषयीही माहिती मिळू शकते.


No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...