Monday, 14 September 2020

नवीन शैक्षणिक धोरण 2022 पासून लागू होत आहे.



🔰नव्या शैक्षणिक धोरणात विद्यार्थ्यांच्या डोक्यावरचे गुणपत्रिकेचे ओझे काढून टाकण्यात आले असून नवीन अभ्यासक्रम पद्धती देश स्वातंत्र्याची 75 वर्षे पूर्ण करीत असताना, 2022 पासून लागू होत आहे.

🔰तयामुळे विद्यार्थी नवीन भविष्याकडे वाटचाल करतील, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.
नवीन धोरणातील अभ्यासक्रम व तरतुदी भविष्यवेधी, वैज्ञानिक पद्धतीच्या आहेत असेही ते म्हणाले.

🔰नवीन धोरणातील तरतुदीनुसार 2022 पासून प्रत्येक विद्यार्थी शिक्षण घेईल.गणिती विचार, वैज्ञानिक विचार, गमतीदार पद्धतीतून शिक्षण यावर भर दिला  आहे.अभ्यासक्रम कमी करून मूलभूत तत्त्वांवर भर दिला आहे.

🔰विद्यार्थ्यांची शिक्षणातून गळती ही त्यांना विषय निवडण्याचे स्वातंत्र्य नसण्याशी काही प्रमाणात निगडित होती. आता त्यांना हे स्वातंत्र्य देण्यात आले आहे. विविध ज्ञानशाखातील बंदिस्तता काढली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

No comments:

Post a Comment