Wednesday 23 September 2020

जागतिक बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक 2020’



ऑक्सफोर्ड पॉवर्टी आणि संयुक्त राष्ट्रसंघ विकास कार्यक्रम (UNDP) या संस्थांनी प्रसिद्ध केलेला जागतिक बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक हे 107 विकसनशील देशांना व्यापणारी बहुआयामी दारिद्र्याचे आंतरराष्ट्रीय परिमाण आहे.


‘जागतिक बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक 2020’ (MPI) अहवालातल्या ठळक बाबी पुढीलप्रमाणे आहेत -


107 विकसनशील देशांमध्ये, 1.3 अब्ज लोक म्हणजेच 22 टक्के लोक बहुआयामी दारिद्रयात जगत आहेत.बहुआयामी दरिद्री लोकांपैकी निम्मे (644 दशलक्ष) 18 वर्षाखालील बालके आहेत.सहापैकी एक प्रौढ यांच्या तुलनेत तीनपैकी एक बालक दरिद्री आहे.


बहुआयामी दरिद्री लोकांपैकीजवळजवळ 84.3 टक्के लोक उप-सहारा आफ्रिका (558 दशलक्ष) आणि दक्षिण आशिया (530 दशलक्ष) प्रदेशात आहेत.67 टक्के बहुआयामी दरिद्री लोक मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये आहेत.


भारताने(2005/2006–2015/2016 या काळात) राष्ट्रीय पातळीवर तसेच बालकांपैकी बहुआयामी दरिद्री लोकांची संख्या (273 दशलक्ष) केली असून ती सर्वात मोठी घट आहे. तसेच MPI गुण देखील निम्मे केले.‘2019/2020 जागतिक बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक’मध्ये भारताचा 62 वा (गुण: 0.123) क्रमांक आहे.


🏵इतर ठळक बाबी.


संयुक्त राष्ट्रसंघाच्या शाश्वत विकासासंबंधी उच्च-स्तरीय राजकीय व्यासपीठावर दरवर्षी जुलै महिन्यात हा निर्देशांक जाहीर केला जातो. मात्र कोविड-19 महामारीमुळे बऱ्याच राष्ट्रांची संपर्ण माहिती प्राप्त झालेली नसल्यामुळे 2019 साली प्रसिद्ध केलेल्या माहितीचा आधार घेऊन यावर्षीचा अहवाल तयार करण्यात आला.


‘जागतिक बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक 2020’ (MPI) यावर देखरेख ठेवून त्यात सुधारणा करण्याची जबाबदारी नोडल संस्था म्हणून नीती आयोग (भारत) या संस्थेकडे सोपविण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

काकोरी कट घटना

( काकोरी ट्रेन लुट म्हणूनही ओळखली जाते) ही ब्रिटिश वसाहतवादी शासनाविरुद्धच्या भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक महत्त्वपूर्ण घटना होती.  - दिना...