Saturday, 26 September 2020

राष्ट्रीय आरोग्य अहवाल 2019 [National Health Profile 2019]



- केंद्रीय आरोग्य मंत्री डाॅ. हर्षवर्धन यांनी नुकतेच अहवालाचे प्रकाशन केले.

- 2005 पासून हा अहवाल प्रकाशित केला जातो. या वर्षीची ही 14 वी आवृत्ती आहे.

- केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अखत्यारीत असलेल्या Central Bureau of Health Intelligence या संस्थेने हा अहवाल तयार केला आहे.

--------------------------------------------

- भारतातील आरोग्य क्षेत्रातील माहितीचे संकलन करून आरोग्य क्षेत्रात काम करत असणारे संघटना किंवा लोकांना ही माहिती उपलब्ध करून देणे हे या अहवालापाठीमागचे मुख्य उद्दिष्ट आहे. 

- लोकसंख्या, राहणीमान, आरोग्य सुविधा इ. वेगवेगळ्या घटकांचा अभ्यास करून हा अहवाल तयार केला जातो.

--------------------------------------------

● महत्त्वाच्या गोष्टी 


- मधुमेह आणि उच्च रक्तदाब यांचे भारतीयांमध्ये प्रमाण जास्त आहे. 

- डेंग्यू आणि चिकनगुनिया हे सार्वजनिक आरोग्यावर परिणाम करणारे दोन मुख्य घटक आहेत. 

- जन्म दर, मृत्यू दर आणि नैसर्गिक वाढीचा दर यातील वाढ कमी झाली आहे. 

- लोकांचे आयुर्मान वाढले आहे, 49.7 वर्षावरून (1970 - 75) वाढून ते आता 68.7 वर्षे (2012 - 16) एवढे झाले आहे. 

- लोकसंख्येची सर्वाधिक घनता NCT दिल्ली (11320 चौकिमी) तर सर्वात कमी घनता अरूणाचल प्रदेशात (17 चौकिमी) आहे. 

- अर्भक मृत्यू दरात घट झाली आहे, 2016 मध्ये हा दर 1000 बालकांमागे 33 एवढा होता. आता ग्रामीण भागात हा दर 37 तर शहरी भागात 23 आहे. 

- 2017 मध्ये जन्म दर 20.2/1000, मृत्यू दर 6.3/1000 तर नैसर्गिक लोकसंख्या वाढीचा दर 13.9/1000 एवढा होता.

- सध्या भारतात 14 वर्षाच्या आतील 27% लोक, 15 ते 59 या वयोगटात 64.7% लोक तर 8.5% लोक हे 60 वर्षापेक्षा जास्त वयाचे आहेत. 

- भारताचा एकूण उत्पादन दर 2.3% आहे, हाच दर ग्रामीण भागात 2.5% तर शहरी भागात 1.8% आहे. 

---------------------------------------

● महाराष्ट्राची स्थिती 


- राज्यातील संसर्गजन्य रूग्णांची संख्या 58,53,915 एवढी आहे, यामध्ये मधुमेह (155628), उच्च रक्तदाब (250875), उच्च रक्तदाब आणि मधुमेह दोन्ही (97651) तर 16880 लोकांना ह्रद्य आणि रक्तवाहिन्यांचे विकार आहेत. 

- राज्यातील 14103 लोकांना तोंडाचा, गर्भाशय मुखाचा तसेच स्तनांचा कॅन्सर आहे.

- 6 महिने ते 5 वर्षे या वयोगटातील 54% बालकांत रक्ताक्षयाचे प्रमाण आढळते तर महिलांमध्ये हे प्रमाण 48% एवढे आहे. 

- राज्यातील 49.3% गरोदर महिलांना रक्ताक्षय (अॅनेमिया) आहे. 

- 15 ते 49 या वयोगटातील 47.9% महिला अॅनेमिया ग्रस्त आहेत.

No comments:

Post a Comment