🔷 सती पध्दत म्हणजे पती निधनानंतर पतीवरील निस्सीम प्रेमाचे द्योतक म्हणून त्याच्यां पत्नीने स्वत:ला जाळून घेणे किंवा चितेत उडी टाकणे.
🔷 ऋग्वेदात सती प्रथा प्रचलित नसल्याचे दिसते. महाकाव्याच्या काळात सती प्रथा होती, पण सक्ती नव्हती इसा या लढाऊ जमातीकडून भारतीयांनी सतीप्रथा स्वीकारली असावी असे मानले जाते.
🔷 नतर पुराण ग्रंथात सती प्रथेला महत्व प्राप्त झाले.
🔷 पती निधनानंतर पत्नीला अतिशय खडतर जीवन जगावे लागत असे. त्यामुळे सती जाणे पसंत केले जाई.
🔷 काही विधवेस कुलप्रतिष्ठेसाठी धर्मासाठी तिच्यावर दबाव आणून पतीच्या चितेवर जाळले जाई.
🔷 ती चितेंतून बाहेर येऊ नये म्हणून लोक बांबू घेऊन चितेभोवती उभे राहत तिच्या किंकाळया ऐकू येऊ नये म्हणून वाद्ये वाजविली जात असत.
🔷 ही प्रथा राजपुतांना बंगाल, विजयनगर भागात मोठया प्रमाणात होती.
🔷 काश्मीरचा राजा सिकंदर, मुघल सम्राट, अकबर, जहांगीर, दुसरा बाजीराव पेशवा, गोव्याचे पोर्तुगीज, श्रीरामपूरचे डॅनिश, चंद्रनगरचे फ्रेंच, चिन्सूरचे डच, यांनी आपल्या राज्यात सती प्रथेवर बंदी घातली होती, पण अपयश आले, इंग्रज राजवटीमध्ये र्लॉड कॉर्नवालिस, र्लॉडमिंटो, र्लॉड हेस्टिग्ज, व अॅमहर्स्ट यांनी प्रयत्न केले.
🔷 काही अटीवर सती पध्दतीला परवानगी देण्याची प्रथा र्लॉड वेलस्लीने सुरु केले.
🔷 सती कायद्यास सनातनी लोकांनी विरोध केला 1812 पासून राजा राममोहन रॉय यांनी प्रयत्न केल्याने र्लॉड बेटिंक यांनी 4 डिसेंबर 1829 रोजी सती बंदीचा कायदा मंजूर केला.
🔷 1830 मध्ये मुंबई, मद्रास प्रांताला लागू केला सती जाणेबाबत सक्ती करणे. सतीच्या वेळी हजर राहणे या गोष्टी गुन्हा ठरविण्यात आल्या
No comments:
Post a Comment