Monday, 14 September 2020

जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन: 10 सप्टेंबर.



◼️दरवर्षी 10 सप्टेंबर या दिवशी जगभर ‘जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन’ पाळला जातो. आत्महत्या रोखण्यासाठी जागतिक वचनबद्धता स्पष्ट करणे आणि त्यासंबंधी पावले उचलणे याविषयी जनजागृती करणे हे या दिवसाचे उद्दीष्ट आहे.

◼️आतरराष्ट्रीय आत्महत्या प्रतिबंध संघ (IASP), जागतिक आरोग्य संघटना (WHO) आणि जागतिक मानसिक आरोग्य महासंघ (WFMH) यांच्या संयुक्त सहकार्याने वर्ष 2003 पासून जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन आयोजित केला जात आहे.

◼️भारतीय गुन्हे अभिलेख विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार,

◼️दशात गेल्या वर्षात सुमारे 1.39 लक्ष जणांनी आत्महत्या केली. आत्महत्यांचे प्रमाण महाराष्ट्र राज्यात अधिक आहे. देशात झालेल्या एकूण आत्महत्यापैकी 13.6 टक्के आत्महत्या एकट्या महाराष्ट्रात झाल्या आहेत.

◼️आत्महत्येच्या तुलनेत आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्यांची संख्या 40 पट जास्त असते. 2019 साली भारतात आत्महत्या करणाऱ्या गृहिणींची संख्या 15.4 टक्के आहे.

◼️2019 साली वयनिहाय आत्महत्येचे प्रमाण - 18 वर्षापेक्षा कमी वय (6.9 टक्के), 18 ते 30 वर्ष वयोगट (35.1 टक्के), 30 ते 45 वर्ष वयोगट (31.8 टक्के)

◼️आत्महत्येची प्रमुख कारणे - कौटुंबिक आणि वैवाहिक कारण, आजारपण, व्यसनाधीनता, प्रेमभंग, कर्जबाजारीपणा.
जगभरात दरवर्षी आठ लक्ष लोक आत्महत्या करतात. जगात दर 40 सेकंदाला एक जण आत्महत्या करतो.

No comments:

Post a Comment