Sunday, 16 August 2020

UNICEF चा “जागतिक लोकसंख्या अहवाल”



- संयुक्त राष्ट्रसंघ बाल कोष (UNICEF) यांचा “जागतिक लोकसंख्या अहवाल” प्रसिद्ध करण्यात आला आहे.

- अहवालात असे म्हटले आहे की 2027 सालापर्यंत जगातला सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश म्हणून भारत चीनला मागे टाकणार.

- UNICEFने यावर ‘वर्ल्ड डेटा लॅब’ बरोबर काम केले. 1 जानेवारी 2020 रोजी जन्मलेल्या बाळांच्या संख्येचा अंदाज UNच्या ‘जागतिक लोकसंख्या अंदाज (2019)’ याच्या अद्ययावत पुनरावृत्तीवर आला आहे.

▪️इतर ठळक बाबी

- नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी म्हणजे 1 जानेवारी 2020 रोजी अंदाजे 67,385 नवजात बाळ भारतात जन्मले जो की एक विक्रम झाला आहे.

- त्या दिवशी जगात जन्मलेल्या अंदाजे 392,078 बाळांपैकी 17% भारतात जन्माला आली. यांपैकी एक चतुर्थांश नवजात बाळ ही दक्षिण आशियामध्ये जन्माला आली आहेत.

- 1 जानेवारी 2020 या दिवशी चीनमध्ये 46 हजार 229 बाळांनी जन्म घेतला. तर नायजेरियात 26 हजार 039, पाकिस्तानात 13 हजार 020, इंडोनेशियात 13 हजार 020, अमेरिकेत 10 हजार 452 बाळांचा जन्म झाला.

- 2020 साली जगातल्या पहिल्या बाळाचा जन्म फिजी देशात झाला.

- 1 जानेवारी 2020 रोजी जागतिक लोकसंख्या अंदाजे 7,621,018,958 वर पोहचली. याचा अर्थ गेल्या वर्षीच्या काळापासून ही अंदाजे वाढ 77,684,873 ने झाली आहे. वाढीचा दर 1.03% असण्याचा अंदाज आहे.

- जानेवारी 2020 मध्ये जगभरात प्रत्येक सेकंदाला 4.3 जन्म आणि 1.9 मृत्यू अपेक्षित आहेत.

- आतापर्यंतच्या दशकात जागतिक लोकसंख्या 8.6 अब्जपर्यंत वेगाने वाढेल अशी संयुक्त राष्ट्रसंघाचा अंदाज आहे. अंदाज असा आहे की 2050 साली हा आकडा 9.8 अब्ज आणि 2100 साली 11.2 अब्जपर्यंत पोहोचेल.

- जवळजवळ निश्चित आहे की जागतिक लोकसंख्या काही वर्षातच 8 अब्जांवर जाणार, जी 1975 सालापासून दुप्पट असणार.

- गेल्या तीन दशकांत जगात नवजात बाळाच्या जगण्याच्या प्रमाणात उल्लेखनीय प्रगती झाली आहे आणि जगभरात वयाच्या पाच वर्षापूर्वी मृत्यूमुखी पडणार्‍यांची  संख्या निम्म्याहून कमी झाली आहे.

- बालमृत्यू ही भारतातली सार्वजनिक आरोग्यासाठीची एक मोठी चिंता आहे आणि जन्माच्या वेळी मृत्यूमुखी पडणार्‍या नवजात बाळांची संख्या जवळजवळ 0.76 दशलक्ष होती आणि सुमारे 3.5 दशलक्ष बाळ अकाली जन्मले.

No comments:

Post a Comment