🔰भारताला अगरबत्ती उत्पादनामध्ये आत्मनिर्भर बनविण्यासाठी खादी व ग्रामोद्योग आयोगाच्यावतीने (KVIC) प्रस्तावित केलेल्या अनोख्या रोजगार निर्मिती कार्यक्रमास केंद्रिय सूक्ष, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाने मान्यता दिली आहे.
🔰खादी अगरबत्ती आत्मनिर्भर मोहीम" नावाच्या या कार्यक्रमाचा उद्देश देशातल्या वेगवेगळ्या भागात बेरोजगार आणि स्थलांतरित कामगारांना रोजगार उपलब्ध करून देणे आणि देशांतर्गत अगरबत्ती उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढविणे हे आहे.
🔴योजनेविषयी...
🔰KVICने सार्वजनिक-खासगी भागीदारी तत्त्वावर केलेली योजना कमी गुंतवणुकीची आणि कारखानदार व भांडवलाशिवाय असल्यामुळे वैशिष्ट्यपूर्ण आहे.
🔰 व्यवसायिक भागीदार म्हणून जे यशस्वी खासगी अगरबत्ती उत्पादक करारावर स्वाक्षऱ्या करणार, त्यांच्या माध्यमातून या योजनेच्या अंतर्गत अगरबत्ती बनविणारे स्वयंचलित यंत्र आणि पावडर मिश्रणाचे यंत्र KVIC तर्फे कारागिरांना पुरविण्यात येणार.
🔰यंत्राच्या किंमतीवर 25 टक्के अनुदान देण्यात येणार आणि उर्वरित 75 टक्के खर्च दरमहा कारागीरांकडून सुलभ हप्त्यांमध्ये वसूल करण्यात येणार.
🔰व्यवसाय भागीदार अगरबत्ती बनविण्यासाठी कारागीरांना कच्चा माल पुरवतील आणि त्यांना रोजगाराच्या आधारावर मजुरी देतील.
🔰कारागिरांच्या प्रशिक्षणाची किंमत KVIC आणि खासगी व्यवसायिक भागीदार यांच्यात सामायिक केली जाणार. ज्यात KVIC 75 टक्के खर्चाचा भार उचलणार तर 25 टक्के व्यवसाय भागीदार देय असणार.
🔰केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या पुढाकाराने वाणिज्य व अर्थ मंत्रालयाने कच्च्या अगरबत्तीवरील आयात निर्बंध आणि बांबूच्या लाठीवरील आयात शुल्कात वाढ या प्रमुख दोन निर्णयांच्या पार्श्वभूमीवर ही योजना आखण्यात आली आहे.
🔰हा पथदर्शी प्रकल्प लवकरच सुरू करण्यात येणार असून आणि पूर्ण क्षमतेने प्रकल्पाची अंमलबजावणी झाल्यानंतर, अगरबत्ती उद्योगात हजारो रोजगार निर्माण होतील.
🔰देशात सध्या अगरबत्तीचा वापर दररोज अंदाजे 1490 मेट्रिक टन आहे, तथापि भारताचे दररोज अगरबत्तीचे उत्पादन फक्त 760 मेट्रिक टन आहे.
No comments:
Post a Comment