Sunday, 16 August 2020

आंतराष्ट्रीय सौर युती (ISA) उपक्रमाचा विस्तार



🔸आतराष्ट्रीय सौर युती (ISA) याचा लाभ संपूर्ण जगाला मिळावा या उद्देशाने जगव्यापी विस्ताराच्या दृष्टीने ‘ISA कार्यचौकटी’मध्ये दुरुस्ती करण्यात आली आहे.

🔸दरुस्तीच्या प्रस्तावानुसार, उष्णप्रदेशापलीकडील देशांसह संयुक्त राष्ट्रसंघ (UN) या सर्वात मोठ्या आंतरराष्ट्रीय गटाचे सर्व 192 सदस्य आंतरराष्ट्रीय सौर युती (ISA) उपक्रमामध्ये सहभागी होऊ शकतात.

आंतरराष्ट्रीय सौर युती (ISA)

🔸परिस हवामान कराराच्या पार्श्वभूमीवर चालवला जाणारा आंतरराष्ट्रीय सौर युती (International Solar Alliance -ISA) हा सर्वसामन्यांना स्वच्छ आणि स्वस्त ऊर्जा उपलब्ध करून देण्यासाठी भारत सरकार आणि फ्रांस सरकार यांच्यावतीने सुरू करण्यात आलेला एक जागतिक उपक्रम आहे. भारतात गुडगावमधील राष्ट्रीय सौर ऊर्जा संस्थान (NISE, गवलपहारी) येथे ISA चे मुख्यालय आणि अंतरिम सचिवालय आहे. ही भारतातली पहिली आंतरराष्ट्रीय व आंतर-सरकारी संस्था आहे.

🔸पतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रांस राष्ट्राध्यक्ष फ्रँकोईस हॉलंड यांनी आंतरराष्ट्रीय सौर युती (ISA) याची स्थापना 30 नोव्हेंबर 2015 रोजी केली. आतापर्यंत 121 संभाव्य सदस्य देशांपैकी 81 देशांनी ISAच्या कार्यचौकटीच्या संदर्भात करारावर स्वाक्षरी केली आहे. त्यापैकी 58 देशांनी त्यास मान्यता दिली आहे.

🔸या उपक्रमाच्या अंतर्गत भारत आणि स्वीडन या देशांनी आपल्या इतर भागीदारांसोबत उद्योग रुपांतरणाची नोंद ठेवण्यासाठी एका नवीन नेतृत्व गटाची स्थापना केली आहे. हा उपक्रम सरकारी आणि खासगी क्षेत्रासोबत एकत्रित काम करून कमी कार्बन उत्सर्जनाचे मार्ग शोधून काढण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावणार आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...