Monday 3 August 2020

मोहालीच्या INST संस्थेत मोतीबिंदूवरील उपचारासाठी शस्त्रक्रिया-विरहित पद्धती विकसित

🔰मोहाली (पंजाब) इथल्या इन्स्टिट्यूट ऑफ नॅनो सायन्स अँड टेक्नॉलॉजी (INST) या संस्थेच्या शास्त्रज्ञांनी मोतीबिंदूवरील उपचारासाठी अ‍ॅस्पिरिन औषधापासून नॅनोरोड विकसित केले आहे. अ‍ॅस्पिरिन हे नॉनस्टेरॉइडल एंटी-इंफ्लेमेटरी ड्रग आहे.

🔴मोतीबिंदू विकार....

🔰मोतीबिंदू म्हणजे डोळ्यातले नैसर्गिक भिंग धुरकट होणे होय. सामान्य डोळ्यात प्रकाशकिरण पारदर्शक भिंगाद्वारे मागील पडद्यावर केंद्रित होतात. उत्तम दृष्टीकरिता नैसर्गिक भिंग पूर्णतः पारदर्शक असणे आवश्‍यक असते. जेव्हा या भिंगाची पारदर्शकता मोतीबिंदू झाल्याने कमी होते तेव्हा रुग्णास अंधूक दिसू लागते.

🔰नैसर्गिक भिंग हा बहुतांशी प्रथिने व न्यूक्लिक आम्ल या जैविक रसायनांपासून बनलेला असतो. यात काही कारणांनी बदल झाल्यास नैसर्गिक भिंगाची पारदर्शकता कमी होत जाते. त्यामुळे दृष्टी कमी होते. नैसर्गिक भिंगाच्या कोणत्याही भागास पारदर्शकत्व आले तर त्याला मोतीबिंदू असे म्हणतात.

No comments:

Post a Comment