Tuesday, 11 August 2020

IMD वर्ल्ड टॅलेंट रँकिंग 2019

स्वित्झर्लंडच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर मॅनेजमेंट डेव्हलपमेंट (IMD) या संस्थेकडून ‘IMD वर्ल्ड टॅलेंट रँकिंग 2019’ या शीर्षकाखाली एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. हा अहवाल देशात प्रतिभावंत व्यक्तित्व तयार करण्यासाठीच्या हेतूने गुंतवणूक व विकास, मागणी आणि तत्परता या तीन मुख्य श्रेणीमध्ये देशांनी केलेल्या कामगिरीवर आधारित आहे.

▪️ठळक बाबी

- टॅलेंट रँकिंगमध्ये स्वित्झर्लंड अग्रस्थानी आहे. घटक पातळीवर, गुंतवणूक व विकास तसेच तत्परता यात त्याचा द्वितीय क्रमांक आणि मागणीमध्ये त्याचा प्रथम क्रमांक आहे.

- यादीतले प्रथम दहा देश – स्वित्झर्लंड, डेन्मार्क, स्वीडन, ऑस्ट्रिया, लक्झेमबर्ग, नॉर्वे, आईसलँड, फिनलँड, नेदरलँड्स, सिंगापूर.

- यादीतल्या पहिल्या दहा राष्ट्रांच्या बाहेर, सर्वात मोठी वाढ तायवान, चीन या देशांनी नोंदवलेली आहे आणि ते 7 स्थानांनी वरती चढत 20 व्या स्थानावर आले आहेत. तसेच लिथुआनिया 8 स्थानांची उडी घेत 28 व्या क्रमांकावर तर फिलिपिन्स 6 स्थानांची उडी घेत 49 व्या क्रमांकावर आणि कोलंबिया 6 स्थानांची उडी घेत 54 व्या क्रमांकावर आहे.

- कॅनडाने अधिक तीव्र घसरणीचा अनुभव घेतला आहे आणि ते 7 स्थानांनी खाली घसरत 13 व्या क्रमांकावर आले आहे. तर पोर्तुगाल गेल्या वर्षीच्या 17 व्या स्थानावरून यावर्षी 23 व्या स्थानावर आले आहे, जापान 6 स्थानांनी खाली येत 35 व्या स्थानी, जॉर्डन 10 स्थानांनी खाली येत 51 व्या स्थानी, टर्की 7 स्थानांनी खाली येत 58 व्या स्थानी आहे.

- भारत 53 व्या स्थानावरुन 59 व्या स्थानावर घसरला आहे. मुख्यताः मागणीच्या घटकाच्या संदर्भातल्या कामगिरीच्या परिणामामुळे भारताची घसरण झाली. प्रदूषणाच्या (कण-स्वरुपात असलेल्या प्रदूषणाचा संपर्क) उपाययोजनेच्या बाबतीत भारताचा क्रमांक 61 वा आहे. जीवनमानाची गुणवत्ता या बाबतीत 51 व्या स्थानी आहे, तर अर्थव्यवस्थेत बुद्धिमत्तेतली घट यात दिसून येणारे नकारात्मक परिणाम या बाबतीत 31 व्या स्थानी आहे आणि प्रतिभा आकर्षित करणे व टिकवून ठेवण्याचा प्राधान्यक्रम या बाबतीत 41 व्या स्थानी घसरले. कामगारांना प्रेरणा या बाबतीत 35 व्या स्थानी अश्या किंचित घसरणीमुळे परदेशी अति-कुशल व्यक्तींना (40 वा क्रमांक) आकर्षित करण्यासाठी योग्य वातावरण होते. प्रति विद्यार्थी शिक्षणावर होणारा एकूण सार्वजनिक खर्च आणि शिक्षणाची गुणवत्ता राखण्याबाबत केलेल्या उपाययोजना या बाबतीत भारताचा 62 वा क्रमांक आहे.

- एकूण 39.12 गुणांसह भारत 59 व्या स्थानी आहे. त्याच्याखाली मेक्सिको, ब्राझील, व्हेनेझुएला आणि शेवटी मंगोलिया या देशांचा क्रम लागतो आहे. BRICS देशांमध्ये भारत चीन (42 वा), रशिया (47 वा) आणि दक्षिण आफ्रिका (50 वा) या देशांच्याही मागे आहे.
———————————————————————————

No comments:

Post a Comment