अंतर (Distance) – अंतर म्हणजे गतिमान वस्तुमधील आरंभ बिंदू आणि अंतिम बिंदू यांच्यातील प्रत्यक्ष मार्गक्रमण होय.
विस्थापन(Displacement) – वस्तू स्थिर झाल्यानंतर आरंभ बिंदू आणि अंतिम बिंदू यांच्यातील कमीत कमी सरळ रेषेतील अंतर म्हणजे विस्थापन होय.
🍀🍀अतर आणि विस्थापन मधील फरक🍀🍀
हे समजून घेण्यासाठी आपण एक उदाहरण घेऊ की, एक मुलगा पूर्वेकडे ३ किमी जातो आणि नंतर उजवीकडे वळून ४ किमी जातो. या एकूण प्रवासामध्ये मुलाने ७ किमी अंतर कापले, पण खरे पाहता त्या मुलाचे विस्थापन ५ किमी एवढेच झाले.
जास्तीत जास्त विस्थापन म्हणजे अंतर होय.
विस्थापन हे अंतरापेक्षा जास्त असू शकत नाही, परंतु अंतर हे विस्थापानापेक्षा जास्त असू शकते.
अंतर ही अदिश राशी (Scalar quantity) आहे, आणि विस्थापन ही सदिश राशी(Vector quantity) आहे.
No comments:
Post a Comment