Tuesday, 11 August 2020

CAG

▪️भारताचे 14 वे नियंत्रक व महालेखापरीक्षक (CAG) म्हणून गिरीश चंद्र मुर्मू यांची नेमणूक करण्यात आली आहे.

📌ही नियुक्ती राजीव मेहऋषी यांच्या जागी करण्यात आली.

▪️भारतीय नियंत्रक व महालेखापरीक्षक (CAG) हे भारतीय संविधानाच्या कलम 148-151 अन्वये स्थापन केलेले पद असून एक प्राधिकारी आहे,

👉 जो शासनाकडून मोठ्या प्रमाणात अर्थसहाय्य मिळविणारी विभागे व प्राधिकरण यांच्या समावेशासह भारत सरकार आणि राज्य सरकार यांच्या सर्व जमा व खर्चाचे लेखापरिक्षण करतो.

▪️याशिवाय, CAG सरकारी मालकीच्या कंपन्यांचे बाह्य लेखापरिक्षक आहेत आणि सरकारी कंपन्यांचे पूरक लेखापरीक्षण करतात.

No comments:

Post a Comment