Wednesday, 12 August 2020

प्लावक बल (Buoyant Force) :

· बोटांनी दाबून पाण्याच्या तळाशी नेलेला लाकडी ठोकळा बोट काढताच उसळी मारून पाण्याच्या पृष्ठभागाशी येतो.

· पाण्यात बुडलेला असल्याने ठोकळ्यावर कार्य करणारे पाण्याचे बल ठोकळ्याला वर ढकलते.

· द्रवात बुडलेल्या वस्तूला वर ढकलणार्यार बलाला प्लावी बल असे म्हणतात. प्लावी बलालाच प्लावक बल किंवा उत्प्रनोद असेही म्हणतात.

· द्रवात बूडालेल्या वस्तूचे आकारमान जास्त असल्यास प्लावक बल अधिक असते.

· द्र्वाची घनता जास्त असल्यास प्लावक बल अधिक असते.

· द्र्वामध्ये एखादा पदार्थ तरंगणार की बुडणार हे प्लावाकबल ठरविते. प्लावक बल वस्तूच्या वजनापेक्षा जास्त असल्यास वस्तु तरंगते.

प्लावक बल वस्तूच्या वजनापेक्षा कमी असल्यास वस्तु बुडते. प्लावक बल वस्तूच्या वजना इतके असल्यास वस्तु द्रवाच्या आतमध्ये तरंगते.

No comments:

Post a Comment