🔰ब्राझील, रशिया, चीन, दक्षिण आफ्रिका आणि भारत या देशांचा समावेश असलेल्या ‘BRICS अमली पदार्थ-रोधी कार्यरत गट’ याची चौथी बैठक या आठवड्यात पार पडली. रशियाच्या अध्यक्षतेखाली 12 ऑगस्ट 2020 रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून यावर्षीची बैठक पार पडली.
🔰भारतीय प्रतिनिधी मंडळाचे नेतृत्त्व अमली पदार्थ नियंत्रण विभागाचे महासंचालक राकेश अस्थाना यांनी केले.
🔴चर्चेतले मुद्दे...
🔰BRICS राज्यांमधील अमली पदार्थांच्या स्थितीसंबंधी मतांची फलदायी देवाणघेवाण, आंतरराष्ट्रीय आणि प्रादेशिक पातळीवर अनधिकृत पद्धतीने होणारी अंमली पदार्थांच्या तस्करीच्या पद्धती, मानसिक संतुलन बिघडविणारे पदार्थ आणि त्यांचे पूर्वगामी तसेच परिस्थितीवरील विविध अंतर्गत आणि बाह्य घटकांचा होणारा परिणाम असे अनेक मुद्दे चर्चेअंतर्गत समाविष्ट केले गेले.
उद्भवलेल्या समान मुद्यांच्या संदर्भात सदस्य देशांमध्ये वास्तिविक माहिती सामायिक करणे आणि सागरी मार्गांद्वारे वाढलेल्या अमली पदार्थांच्या वाहतुकीवर अंकुश ठेवणे तसेच अंधाराचा गैरफायदा आणि अमली पदार्थांच्या वाहतुकीसाठी इतर प्रगत तंत्रज्ञानाचा गैरवापर हे या बैठकीचे प्रमुख मुद्दे होते.
🔴BRICS विषयी...
🔰BRICS हा ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका या पाच राष्ट्रांचा समूह आहे. 2006 साली या समूहाची स्थापना झाली. 2011 साली BRIC समुहात दक्षिण आफ्रिकेचा समावेश करण्यात आला आणि समूहाला BRICS हे नाव दिले गेले.
🔰रशियाच्या येकतेरिनबर्ग शहरात दिनांक 16 जून 2009 रोजी BRIC समूहाची पहिली औपचारिक परिषद आयोजित करण्यात आली होती. 2009 सालापासून BRICS राष्ट्रे औपचारिक परिषदेत दरवर्षी भेट घेतात.
No comments:
Post a Comment