१८ ऑगस्ट २०२०

नागपुरात तंबाखू व खर्रा बंदी; १५ ऑगस्टपासून अंमलबजावणी सुरू



🔰नागपूर शहरात सार्वजनिक ठिकाणी तंबाखू, सुगंधित सुपारी, खर्रा, पान खाण्याचा व खाऊन थुंकण्यास तसेच याची निर्मिती, साठवण, वितरण व विक्रीला प्रतिबंध घालण्यात आला आहे. महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी याबाबतचे आदेश १५ ऑगस्ट रोजी जारी केले आहेत.

🔰नागपूर शहरात सार्वजनिक ठिकाणी तंबाखू, सुगंधित सुपारी, खर्रा, पान खाण्याचा व खाऊन थुंकण्यास तसेच याची निर्मिती, साठवण, वितरण व विक्रीला प्रतिबंध घालण्यात आला आहे. महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी याबाबतचे आदेश १५ ऑगस्ट रोजी जारी केले आहेत.

🔰सार्वजनिक ठिकाणी तंबाखू, खर्रा, गुटखा खाऊन थुंकणाऱ्यास एक हजार तर निर्मिती, वितरण व विक्री करणाऱ्यास पाच हजार रुपये दंड आकारला जाणार आहे. महाराष्ट्र शासनाने कोरोना विषाणूने उद्भवणाऱ्या संसर्गजन्य रोगांचा प्रतिबंध व नियंत्रण करण्यासाठी महाराष्ट्र कोविड-१९ उपाययोजना नियम २०२० यातील नियम ३ नुसार शहरी भागात आयुक्त महापालिका यांना सक्षम प्राधिकारी म्हणून घोषित केले आहे. त्यांच्या कार्यक्षेत्रातील प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे अधिकार आहेत. त्यानुसार आयुक्तांनी आदेश जारी केले आहेत.

🔰सार्वजनिक ठिकाणी खर्रा खाऊन थुंकल्यास एक हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे.
तंबाखू, खर्रा, सुगंधित सुपारी, गुटखा पान मसाला, मावा व तत्सम पदार्थांची निर्मिती साठवण व विक्री करणाऱ्यास पाच हजार रुपये दंड आकारला जाईल.

🔴यांना आहेत कारवाईचे अधिकार

🔰तबाखू, खर्रा, सुगंधित सुपारी, गुटखा पान मसाला, मावा व तत्सम पदार्थ खाऊन थुंकणे व विक्री करणऱ्यावर कारवाई करण्यासाठी पथके तयार करण्यात आली आहेत. मनपाचे उपद्रव शोध व निर्मूलन पथक, स्वच्छता निरीक्षक, मुख्य स्वच्छता अधिकारी संबंधित झोनचे सहायक आयुक्त, पोलीस उपनिरीक्षक अधिकाऱ्यांना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व कारवाई करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Latest post

ठळक बातम्या.१३ मार्च २०२५.

१. डॉ. अम्ब्रीश मिथल  -डॉ. अंबरीश मिथल यांना २०२५ च्या कमिटी ऑफ सायंटिफिक अॅडव्हायझर्स (CSA) मेडल ऑफ अचिव्हमेंटने सन्मानित करण्यात आले. २. म...