Wednesday, 18 January 2023

सहकाराची तत्वे.



🅾️इ.स. 1895 मध्ये जिनिव्हा (स्वित्झरलँड) येथे आंतरराष्ट्रीय सहकारी संघाची (International Co-operative Alliance - ICA) स्थापना झाली.

🅾️ICA ने 1937 मध्ये सहकारी तत्वांची तपासणी करून पद्धतशीर मांडणी करण्यासाठी एक समिती नेमली.

🅾️ सहकारी संस्थांचे संघटन व व्यवस्थापन करण्यासाठी वापरलेले मार्गदर्शक तत्व म्हणजे सहकारी तत्व होय.मात्र, या समितीने ठरविलेल्या तत्वांवर एकमत न झाल्याने ICA ने 1963 मध्ये सहकार तत्वाचे मूल्यांकन व फेरतपासणी करण्यासाठी भारतातील जागतिक किर्तीचे सहकार तत्वज्ञ प्रा.डि.जी. कर्वे यांच्या अध्यक्षतेखाली दुसरी समिती नियुक्त केली.तसेच या समितीच्या 1966 च्या अहवालात पुढील सहकाराची तत्वे देण्यात आली आहेत.

1. मूलभूत तत्वे -

🅾️ऐच्छिक सभासदत्वलोकशाही संघटनगुंतविलेल्या पुंजीवर व्याजधारण केलेल्या भागांच्या प्रमाणात लाभांश वाटपसभासद शिक्षणसहकारी संस्थातील सहकार्य

2. सामान्य तत्वे -

🅾️रोखीने व्यवहारराजकीय व धार्मिक अलिप्तता - हे तत्व मात्र अव्यवहार्य वाटल्याने वगळण्यात आले.काटकसरस्वावलंबन व परस्पर मदबसेवा भाव

🧩सहकारी संस्थांचे प्रकार -

सहकारी संस्थांचे प्रमुख चार वर्ग पडतात.

1. कृषी पतसंस्था (Agricultural Credit Co-Operatives) -

🅾️भारतात राज्यांमधील कृषी पतसंस्था रचना त्रिस्तरीय आहे.

🅾️गरामीण स्तरावरील प्राथमिक कृषी सहकारी पतसंस्था.जिल्हा स्तरावरील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक.राज्य स्तरावरील राज्य सहकारी बँक (शिखर बँक).तसेच दीर्घ मुदतीचा कर्जपुरवठा करण्यार्‍या भू-विकास बँका राज्य व जिल्हा स्तरावर कार्य करतात.

2. बिगर कृषी पतसंस्था (Non-Agricultural Credit Co-Operatives) -

🅾️नागरी सहकारी बँकापगारदार नोकरांच्या पतसंस्थाप्राथमिक शिक्षकांच्या पतसंस्था इ.

3. कृषी बिगर पतसंस्था (Agricaltural-Non-Credit Co-Operatives) -

🅾️सहकारी साखर कारखाने, खांडसरी उद्योगसहकारी सूत गिरण्यासहकारी दूध उत्पादक संस्थासहकारी तेलप्रक्रिया संस्थाकृषी खरेदी-विक्री संघकृषी सहकारी पणन संस्थाप्राथमिक मच्छिमारी सह.संस्था. इ.

4. बिगर-कृषी-बिगर-पतसंस्था (Non-Agricaltural-Non-Credit Co-Operatives) -

🅾️सहकारी ग्राहक भांडारे.सहकारी गृहनिर्माण संस्था.पावरलुम विणकर सह. संस्था.चर्मकार सह. संस्था.कुंभार सह. संस्था इ.


No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...